Even after four and a half years, there is no change in Potanium 
कोल्हापूर

भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ राजकारण विरहित करण्याच्या निर्णयास हरताळ

राजू पाटील, राशिडे बुद्रुक

राशिवडे बुद्रुक, कोल्हापूर : भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ भोगावती कारखान्याच्या सर्व सभासदांच्या मालकीचे करून कायमची निवडणूक बंद करायची आणि राजकारण विरहित शिक्षण संस्था करायची या निर्णयाला आता जणू हरताळ फासल्यात जमा आहे. कारण निवडणूक होऊन तब्बल साडेचार वर्षे झाली तरी या संस्थेचा पोटनियम अद्यापही बदललेला नाही आणि यावर कुठल्याही पक्षाचा आवाज उठत नाही. याबाबत आता सभासदामधूनच विचारणा होत आहे. 
भोगावती साखर कारखान्यांच्या निर्मितीनंतर पाठोपाठ भोगावती शिक्षण प्रसार मंडळाची स्थापना केली. भोगावती हायस्कूल आणि कुरूकली येथे भोगावती महाविद्यालय सुरू झाले. याचा तालुक्‍यातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा झाला. मात्र भोगावती कारखान्याबरोबरच या संस्थेत राजकारण सुरू झाले. यावर तोडगा म्हणून सर्वपक्षीय सुकाणू समिती नेमून ही संस्था भविष्यात साखर कारखान्यावर येणाऱ्या संचालक मंडळाच्या अधिकाराखाली देण्याचे ठरले. त्यानुसार सर्व पक्षांनी संमती दिली या सुकाणू समितीचे अध्यक्ष म्हणून स्वाभिमानचे प्रदेशाध्यक्ष व भोगावती महाविद्यालयाचे प्रा. डॉ. जालंदर पाटील यांच्याकडे देण्यात आले. योग्य तोडगा काढल्यानंतर निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरले होते. पण निवडणूक लागली. तरीही सुकाणू समितीचे पॅनेल बहुमताने निवडून आले. 
सत्तेवर आल्यानंतर काही दिवसांतच पोटनियम दुरुस्त करून ही संस्था कारखान्यावर येणाऱ्या प्रत्येक संचालक मंडळाच्या किंवा ते देतील त्या मंडळाच्या अधिकाराखाली राहील ही निश्‍चित झाले होते. मात्र याला साडेचार वर्षे उलटून गेली तरीही अद्याप पोटनियम दुरुस्त झाला नाही, की सत्ता कारखान्याच्या संचालक मंडळाकडे आलेली नाही. या वरती कोणताही राजकारणी व्यक्ती भाष्य करत नाही. मात्र कारखान्याचे पर्यायाने या शिक्षण मंडळाचेच सभासद आता पुढे काय याची विचारणा करू लागला आहे. 


लोकांनी व सभासदांनी विश्वास दाखवून सुकाणू समिती निर्माण केली होती. शिक्षण प्रसारक मंडळात राजकारण नको म्हणून समिती झाली. परंतु ठरलेल्या गोष्टीला सपशेल हरताळ फासला जात असल्याचे पुढे येत आहे. आता यावरती तोडगा निघेल हेही जाणवत नाही. सुकाणु समितीचे अध्यक्षपद घेतले याचीच मला खंत वाटत आहे. 
-डॉ. जालंदर पाटील

संपादन -यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindustani Bhau vs Uddhav Thackeray : 'उद्धव ठाकरेंचे १५ आमदार २५ नगरसेवक फुटणार'; हिंदुस्थानी भाऊचा इशारा; संजय राऊतांना अरूण गवळींची दिली आठवण

पाऊस बाहेर पडतोय पण मराठी अभिनेत्रीच्या नव्या घरातच सुरू झाला धबधबा; मॉपने काढतेय पाणी, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Latest Marathi News Live Update : वडाळ्यात दुकान कोसळले, ३ जखमी

Kurla: कुर्ल्यात लपाछपीचा खेळ ठरला जीवघेणा; 10व्या मजल्यावरून पडून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू, थरार CCTV मध्ये कैद

Mumbai News: मुसळधार पावसाचा तडाखा! नालासोपाऱ्यात चार खोल्या कोसळल्या; जीवितहानी टळली, बाधितांना तातडीची मदत

SCROLL FOR NEXT