The examination will have to be given to the Deputy Superintendent of Police  
कोल्हापूर

Video - धक्कादायक ; सात वर्षानंतर शासनाला जाग ; कोरोना योद्धा पोलिसांना द्यावी लागणार परीक्षा 

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर - पोलिस अधिकाऱ्यांची प्रशिक्षणावेळी न घेतलेली परीक्षा सहा-सात वर्षे अधिकारी म्हणून सेवा बजावल्यानंतर आत्ता घेण्याचा मुहूर्त शासनाला मिळाला आहे. कोरोना विषाणुच्या महामारीत अनेक परीक्षा रद्द केल्या आहेत. मात्र कोरोना योद्धा असलेल्या पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना ही परीक्षा द्यावी लागणार आहे. राज्यात एकूण 185 पोलिस अधिकाऱ्यांना तर जिल्ह्यातील चार पोलिस उपअधीक्षकांना परीक्षा द्यावी लागणार आहे. ही परीक्षा जर ते नापास झाले तर त्यांच्या पदावर गंडांतर येऊ शकते. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षा घेतल्यानंतर उपअधीक्षक म्हणून काही काळ प्रशिक्षण घ्यावे लागते. या प्रशिक्षणाच्या कालावधीत या अधिकाऱ्यांना दोन परीक्षा द्याव्या लागतात. सहामाहीच्या या दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना प्रत्यक्षात फिल्डवर नियुक्त केले जाते. साधारण 2012 नंतर अशा परीक्षाच झाल्या नाहीत. तरीही अनेक पोलिस अधिकाऱ्यांना "पोस्टींग' दिले. साधारण सहा-सातवर्षे या पोलिस अधिकाऱ्यांनी सेवा बजावली. काहींना उत्कृष्ठ कामाबद्दल पारितोषक मिळाली. कोरोना महारामीत सुद्धा त्यांनी जीवाचीबाजी लावून कर्तव्य बजावले आहे. तरीही प्रशिक्षणाच्या कालावधीत त्यांनी जी परीक्षा दिलेली नाही ती देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. राज्यातील 185 पोलिस अधिकाऱ्यांना ही परीक्षा द्यावी लागणार आहे. कोल्हापूर जिल्हयातील चौघा पोलिस उपअधीक्षकांचा यामध्ये समावेश आहे. ते सध्या अभ्यासाला लागले आहेत. 

कोरोना विषाणुचा संसर्ग वाढू नये म्हणून अनेक परीक्षा रद्द केल्या आहेत. शैक्षणिक वर्षे अद्याप सुरू झालेले नाही. कोरोना विषाणुचा धोका आजही कायम आहे. जिल्हा बंदी आहे. लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये पोलिसांना बंदोबस्ताचा मोठा ताण आहे. तपासणी नाक्यावर लक्ष ठेवावे लागत आहे. याच बरोबर दैनंदिनी कामे आणि तपासाचे काम सुरूच आहे. अशा अवस्थेत सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र पोलिस अकादामीच्या माध्यमातून जुलै मध्ये ही परीक्षा घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 

परीक्षेत दोन पेपर असणार आहेत. प्रत्येक पेपर शंभर गुणांचा आहे. यामध्ये कायद्याचे प्रश्‍न असणार आहेत. त्याचा अभ्यास आता पोलिस उपअधीक्षकांना करावा लागत आहे. कोरोना महामारीच्या कालावधीतच ही परीक्षा घेतल्यामुळे पोलिस अधीकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought: शरद पवार करणार दुष्काळाची पाहणी; राज्यात २८ सप्टेंबरपासून दौरा; शेतकऱ्यांशी थेट संवाद

Bangladesh MP Arrested : ७५ वर्षीय खासदाराच्या १९ वर्षीय पत्नीने उचललं टोकाचं पाऊल; घटनास्थळी चिठ्ठी सापडली अन्, खासदाराला पोलिसांकडून अटक

Poonam Shinde Death : कोल्हापुरात खराब रस्त्याने घेतला कर्त्या महिलेचा जीव; मोपेड घसरून पडल्यानंतर डंपरच्या चाकाखाली चिरडले डोके, मुलगी जखमी

Marathi News Live Updates : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

IND vs JPN, T20I: भारत-जपानमधील ऐतिहासिक क्रिकेट सामन्यावर पडणार पावसाचं पाणी? नव्या ठिकाणी खेळण्यास टीम इंडिया सज्ज

SCROLL FOR NEXT