कोल्हापूर

वन्यजीव विभागासमोरच बॉक्‍साईटचे उत्खनन

राजू पाटील, राशिडे बुद्रुक

राशिवडे बुद्रुक, कोल्हापूर : राधानगरी अभयारण्य वन्यजीव विभागाच्या हत्तीमहल कार्यालयासमोरच्या डोंगरावरच बॉक्‍साईट उत्खनन होते. ही बाबच या खात्याला धक्का देणारी ठरली आहे. या कार्यालयाच्या खिडकीतूनच समोरचा डोंगर दिसतो आणि तिथूनच बॉक्‍साईट नेले जाते. एवढे धाडस हे या खात्याला आव्हान देणारी घटना ठरली आहे. एकीकडे इकोसेन्सिटिव्ह झोन करून अभयारण्याचा विस्तार केला जात असताना मुख्य गाभ्यातच होणारी तस्करी नवे आव्हान ठरले आहे. 
राधानगरी तालुक्‍यात बॉक्‍साईट विपुल प्रमाणात आहे हे सत्य आहे. यातूनच एक कंपनी बक्कळ पैसे मिळवून गेली. दोन वर्षापूर्वी ह्या या कंपनीने गाशा गुंडाळल्याचे समजते. त्यानंतर तालुक्‍यात उत्खनन पूर्ण बंद असल्याचे पुढे आले. मात्र अभयारण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या जमिनी कांहीनी भाडेपट्टीवर घ्यायच्या आणि शेतीच्या नावाखाली नकोते उद्योग करायचे, अशी प्रकरणे अलीकडे पुढे येत आहेत. 
अनेक भागात कोल्हापुरातील पैसेवाल्यानी जमिनी घेतल्याची उदाहरणे आहेत. यापैकी मिसाळवाडी येथील जमीन एका बड्या व्यक्तीने स्थानिकांकडून भाडेपट्टीवर घेतली आहे. आजही त्या जमिनीमूळ मालकाच्या नावे आहेत. मात्र त्यावर हक्क भाडेकरूंकडन दाखवला आहे. मिसाळवाडीच्या जमिनीवर सहा वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात सपाटीकरण झाले होते. आता शेतीही केली जात आहे. त्याच्या परिसरातील क्षेत्रांमध्ये निघणार याबॉक्‍साईटच्या खडकांची विक्री चोरट्या पद्धतीने सुरू असल्याचे यावरून पुढे आले आहे. तीन वर्षापूर्वी याच परिसरातील जोंधळेवाडी या क्षेत्रातून उत्खनन करून बॉक्‍साईटचे खनिज नेताना, अशीच कारवाई झाली होती. त्या कारवाई वरूनही फारसे गांभीर्याने घेतल्याची दिसून येत नाही. हाकेच्या अंतरावरील डोंगरावर होणारे उत्खनन हे या खात्याला समजू नये, ही बाब ही संशोधनाची ठरत आहे. या सपाटी करण्याची धूप झालेली माती थेट राऊतवाडी धबधब्यातून राधानगरी धरणात येते आणि गाळ साचतो, ही बाब ही तितकीच गंभीर आहे. याकडे पाटबंधारे विभागानेही कधी काळजीपूर्वक पाहिल्याचे दिसत नाही. 
वन क्षेत्रात असे प्रकार घडतात आणि तेही कार्यालयाच्या कक्षेत. एखादा पोकलॅण्ड सुरू असेल तरी त्याचा आवाज कार्यालयाच्या अधिकाऱ्याच्या कानावर यावा, एवढे अंतर असताना ही डोळेझाक नेमकी का होते. कुणाचे दबाव येतात? ही चर्चा आता रंगली आहे. 
मंगळवारच्या प्रकरणात चंदगडच्या उत्खननाचा पास आणि इथून बॉक्‍साईटचे खनिज पनवेलला घेऊन जाताना सापडलेला 14 चाकी ट्रक हे निश्‍चितच सामान्यांचे काम नाही. त्यामागे फार मोठी शक्ती असणार हे स्पष्ट होत आहे. तरीही त्याला न जुमानता आज वन विभागाच्या अधिकाऱ्यानी मोठ्या धाडसाने वाहने जप्त केली आहेत हेही ही निश्‍चितच कौतुकास्पद आहे. 

दोन ट्रॅक्‍टर, पोकलॅंड ताब्यात 
काल झालेल्या कारवाईनंतर आज या प्रकरणात वापरण्यात आलेले दोन ट्रॅक्‍टर व एक पोकलॅंड वन्यजीव विभागाने ताब्यात घेतले असून ते राधानगरी येथील कार्यालयाच्या आवारात जप्त करून ठेवण्यात आले. असल्याची माहिती येथील वनक्षेत्रपाल नवनाथ कांबळे यांनी दिली आहे.

संपादन ः यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोरून अपहरण, २ हजार मृत्यूंचं गूढ अन्...; कोण होते 'सतलुज'चे खरे नायक जसवंत सिंह खालरा?

WTC 2025-27 Point Table: वेस्ट इंडिजने पाकिस्तानला त्यांची जागा दाखवली; २३ वर्षानंतर श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका जिंकली

"We Want Sanju!"; चाहत्यांची नारेबाजी... गौतम गंभीरचा चेहरा पाहण्यासारखा झाला, तिलक वर्माही सोबत होता; Viral Video

'मलाही माहितेय की तो कसा आहे?' अंकुश चौधरीबद्दल दीपा परब म्हणाली, 'आम्ही नवरा बायको होण्याअगोदर...'

Wari Prasthan 2026:आषाढी वारीसाठी पालखीचं प्रस्थान होतं म्हणजे नेमकं काय ? प्रस्थानत्रयी म्हणजे काय ?

SCROLL FOR NEXT