Excavation caused the gas pipeline to leak on Thursday in belgum 
कोल्हापूर

बेळगावात गॅसवाहिनीला गळतीचा प्रकार सारखाच का घडतोय ?

सतिश जाधव

बेळगाव - स्मार्ट सिटी योजनेच्या कामासाठी सुरू असलेल्या खोदाईमुळे गुरूवारी गॅसवाहिनीला गळती लागली. डॉ. आंबेडकर रोडवरील मॅक्‍स शोरूम समोर हा प्रकार घडला. गळतीमुळे वाहीनीतून मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली. याची माहिती मेगा गॅस कंपनीला मिळाल्यानंतर त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. तब्बल एक तासाच्या प्रयत्नानंतर तेथील गळती थांबविण्यात मेगा कंपनीच्या पथकाला यश आले. गेल्या तीन महिन्यात शहरातील मुख्य गॅस वाहिनीला गळती लागल्याची ही तिसरी घटना आहे. याआधी शास्त्रीनगर व पोलिस मुख्यालयासमोर गळती लागली होती. तिन्ही वेळी स्मार्ट सिटी योजनेच्या कामामुळेच वाहिनीला गळती लागल्याचा आरोप मेगा गॅस कंपनीने केला आहे. शहरातील गॅस वितरण करणाऱ्या अन्य वाहिन्यांचे नुकसान तर दररोज होत आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या संबंधित ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय मेगा कंपनीने घेतला आहे. याशिवाय स्मार्ट सिटी विभागालाही रीतसर नोटीस पाठविण्यात येणार आहे. 

शहरात घरगुती गॅस पुरविण्याची योजना स्मार्ट सिटी योजनेचाच भाग आहे. मेगा गॅस कंपनीला हा ठेका मिळाला आहे. कंपनीकडून शहरात गॅस वाहिन्या घालण्यात आल्या आहेत. त्या माध्यमातून सुमारे 54 हजार घरांना पीएनजी गॅस पुरविण्याची योजना आहे. शहरातील उपनगरांमध्ये गॅस जोडण्या देण्यात आल्या आहेत. आता शहरात स्मार्ट सिटी योजनेचे काम सुरू आहे. त्या कामासाठी खोदाई करताना मुख्य गॅस वाहिनीचे नुकसान होत आहे. यामुळे गॅस गळती होत आहे, त्यामुळे ही बाब धोकादायक असल्याचे मेगा कंपनीचे म्हणने आहे. गुरूवारी सकाळी मॅक्‍स शोरूमसमोर खोदाई सुरू असताना अचानक गॅस वाहिनीचे नुकसान झाले व गळती सुरू झाली. याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने अग्नीशमन दलाचे पथक तेथे पोहोचले. त्यानंतर मेगा गॅस कंपनीचे पथकही दुरूस्तीसाठी पोहोचले. त्यानी तातडीने उपाययोजना करून गळती थांबविली. गळती सुरू असताना आगीची दुर्घटना घडण्याची भिती होती, त्यामुळे काही काळ तेथील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली. मेगा कंपनी व अग्नीशमन विभागाने तत्परता दाखविल्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली. पण या प्रकारामुळे त्या परीसरातील व्यावसायीक व नागरीकांची मात्र भितीने गाळण उडाली.

 स्मार्ट सिटी योजनेच्या कामांवेळी गॅस वाहिनीचे सातत्याने नुकसान होत असल्याने मेगा कंपनीने बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानी दोन्ही विभागाची संयुक्त बैठक घेवून समस्येवर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला होता. पण अद्याप ती बैठक झालेली नाही. स्मार्ट सिटीची कामे करताना मेगा कंपनीच्या प्रतिनिधीना बोलावून वाहिनीची माहिती घेतली जावी अशी विनंती स्मार्ट सिटी विभागाला अनेकदा करण्यात आली आहे, पण स्मार्ट सिटीकडून त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळेच गळतीचा प्रकार वारंवार घडत आहे.

विभागाच्या ठेकेदारामुळे मुख्य गॅसवाहीनीचे नुकसान झाले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गळती झाली. हा प्रकार वारंवार होत आहे. पण या प्रकरणी आता ठेकेदाराला कायदेशीर नोटीस बजावण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी विभागालाही याप्रकरणी नोटीस बजावणार आहे.

- कामील पाटाईत. सहयोगी व्यवस्थापक, मेगा गॅस कंपनी- स्मार्ट सिटी

संपादन - मतीन शेख

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani News : अतिवृष्टीग्रस्त परभणी जिल्ह्यासाठी १२८ कोटींची आर्थिक मदत मंजूर; शेतकऱ्यांना थेट खात्यात जमा होणार नुकसानभरपाई

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Parner Crime : सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना कामगार तलाठ्याला रंगेहाथ पकडले

Pune Heavy Rain : पाषाण परिसरात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी; चाकरमान्यांचे हाल, सखल भागात पाणी साचले

SCROLL FOR NEXT