कोल्हापूर

गोवा हवामान विभागाच्या एका कृतीने कोल्हापूरकर गॅसवर; एलियनच्याही चर्चा

अलिकडे घडलेली ही घटना ताजी असताना आता कोल्हापुरातून आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मागील काही दिवसांपूर्वी विदर्भात एका प्रदेशात आकाशातून कोसळणाऱ्या फायर बॉलचा थरार अनेकांनी अनुभवला होता. या घटनेमुळे अनेक तर्क वितर्क लावले गेले होते. अनेकांनी याला एलिएन्स असल्याची भीतीही व्यक्त केली होती. अलिकडे घडलेली ही घटना ताजी असताना आता कोल्हापुरातून आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तबकडी (UFO) कोल्हापूरच्या आकाश उडत असल्याचं दिसत आहे. दरम्यान, अनेकांकडून एलिएन्सची (alliance) थेअरी मांडली जात आहे.

यासंदर्भात आता एक वेगळी बातमी समोर आली आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून एलिएन्सबाबतची ही घटना आहे अशी धक्कादायक माहिती समोर येत होती. मात्र आता यापाठीमागचे सत्य समोर आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथे दिसलेली ही तबकडी नसून पांढराशुभ्र बलून माहिती मिळत आहे. हा बलून गोव्याच्या हवामान खात्याने सोडला असून त्याचा उपयोग तापमान, हवेचा दाब, वेग दिशा आणि नोंद करण्यासाठी केला जातो, अशी माहिती मिळाली आहे.

नेमकी काय आहे घटना?

पन्हाळ्यात आकाशात पश्चिम दिशेला उंच पांढरेशुभ्र आणि चकाकत असलेले उडती तबकडी सदृश्य काहीतरी दिसून आले. आज सकाळी तब्बल दोन तास पश्चिमेला आकाशात उंच असा बलून सदृश (पण बलून नाही) एक पांढरा शुभ्र गोल अचानक दिसत होता. हा गोल अत्यंत कमी वेगाने पुढे सरकत असल्याचे जाणवत होते. दरम्यान, अनेकांनी आपल्या मोबाईलवर या घटनेचा व्हिडिओ बनवला आहे. अचानक डोळ्याने पहाता येईल अशी पण विमान जातात त्याहीपेक्षा खूप उंच अंतरावरून ही वस्तू आकाशात पाहायला मिळाल्याने नागरिकांत हे काय असेल याचे कुतूहल निर्माण झाले होते. मात्र आता ही वेगळी माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा बदली? तुकाराम मुंढेंना पालक सचिव पदावरून हटवले, कुणाची वर्णी?

Madhuri Mahadevi Elephant Hearing : निराशा! ‘माधुरी’ हत्तीणीचा कोल्हापूर प्रवास आणखी लांबणार; आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं?

Sanjay Gandhi: ज्योतिषाने म्हटलेलं, संजयची जीवनरेषा छोटी आहे; चामुंडेच्या पुजाऱ्यानेही दिला होता इशारा, इंदिरा गांधी घाबरल्या...

Vishwas Nangare Patil : विश्वास नांगरे पाटील यांची बदली, 'या' शहराच्या पोलीस आयुक्तपदी वर्णी...

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्ह्याला पुढील चार दिवस ‘येलो’ अलर्ट

SCROLL FOR NEXT