For the first time in history, the wildlife census canceled kolhapur marathi news  
कोल्हापूर

इतिहासात प्रथमच प्राणिगणना रद्द

राजू पाटील : सकाळ वृत्तसेवा

राशिवडे बुद्रुक (जि. कोल्हापूर) : प्रत्येक मेमध्ये बुद्ध पौर्णिमेला अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पामध्ये होणारी प्राणिगणना निसर्गप्रेमींसाठी पर्वणी असते. आजवरच्या इतिहासात प्रथमच या उपक्रमाचा मार्ग कोरोनाने रोखला आहे. यंदा ही संधी हुकणार आहे. राधानगरी- दाजीपूरसह चांदोली व्याघ्र प्रकल्पाचीही प्राणिगणना रद्द केली आहे. 
राज्यातील सर्व जंगलांमध्ये 7 व 8 मे रोजी बुद्ध पौर्णिमेच्या काळात प्राणिगणना व निसर्ग अनुभव कार्यक्रम होणार होता; मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सामाजिक अंतर ठेवणे शक्‍य होणार नाही व जिल्हा व राज्याबाहेरून येणारे निसर्गप्रेमी कोरोना संक्रमित असल्यास त्याचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. परिणामी विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे वन्यजीव मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी घेतला आहे. त्यांनी प्राणिगणना रद्दचे आदेश सर्व विभागांना पाठविले आहेत. यामुळे कोल्हापूर विभागातील प्राणिगणना रद्द झाली आहे. 


अन्य अभयारण्ये, व्याघ्र प्रकल्पांनाही सूचना 
मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती-पेंच, बोर, नागपूर- ताडोबा, अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोल्हापूर, नवेगाव, नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्व अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पांना मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांच्याकडून प्राणिगणना रद्दच्या सूचना दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Red Alert: नाशिकला रेड अलर्ट; अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे सप्तशृंगी गड व नांदुरी घाट मार्ग ७ ते ९ जुलैपर्यंत भाविकांसाठी बंद

Junnar Rains : जुन्नर तालुक्यात मुसळधार पावसाने धरणसाठा वाढला; अलदरेतील बंधारा फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Pune Mula-Mutha flood : मुळा-मुठा नदीला पूर; कोरेगाव मुळ येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पुल पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला

India T20I Squad: भारताचा T20I संघ जाहीर! झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संजू सॅमसनला डच्चू, तर रिंकू सिंगचे पुनरागमन

Raigad Flood : रायगडमध्ये मुसळधार पावसाने कहर; सावित्री, अंबा, कुंडलिका, पाताळगंगा नद्या धोक्यापलीकडे, जनजीवन विस्कळीत

SCROLL FOR NEXT