Fish seed center more efficient Aslam Sheikh
Fish seed center more efficient Aslam Sheikh sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : मत्स्यबीज केंद्रे अधिक सक्षम करणार-अस्लम शेख

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : पुढील सहा महिन्यांत राज्यातील मत्स्यबीज केंद्र अधिक सक्षम करणार असल्याचे मत मत्स्यविकास मंत्री अस्लम शेख यांनी आज येथे स्पष्ट केले. तसेच मागील सरकारने मच्छीमारांच्या परताव्याचीही थकबाकी ठेवली असल्याची टीका त्यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केली. तोही परतावा आणि थकबाकी पुढील दोन-तीन वर्षांत देणार असल्याचे सांगून मच्छीमारांना दिलासा दिला. मंत्री शेख इचलकरंजीतील यंत्रमागधारकांशी उद्या (ता. ६) चर्चा करणार आहेत. त्यासाठी ते आज कोल्हापुरात दाखल झाले. येथे पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला.

ते म्हणाले, ‘‘मागील सरकारने पाच वर्षे काहीच मोठे काम केलेले नाही. दिलेला निधीही वापरला गेला नाही. मच्छीमारांचे परतावेही दिलेले नाहीत. मागील सरकारने मच्छीमारांची दोनशे कोटींची थकबाकी ठेवलेली आहे. आमचा हा प्रयास आहे की मागील थकबाकी आणि सध्याचा परतावा एकत्रित करून पुढील तीन-चार वर्षांत देता येईल. कोरोना आला नसता तर आम्ही दोन वर्षांतच ही थकबाकी दिली असती.’’

मत्स्यविकासाबद्दल बोलताना शेख म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात जेवढे मत्स्यबीज केंद्रे आहेत, ते अधिक सक्षम केले जाणार आहेत. बाहेरून आपल्याला बीज अथवा खाद्य आणावे लागणार नाही, याची उपाययोजना केली जाणार आहे. राज्यातच उत्पादन आणि उपलब्धता राहील यासाठी प्रयत्न होणार आहेत. परराज्यावर अवलंबून रहावे लागणार नाही, यासाठी शासनाकडून काम होणार आहे. मत्स्यबीज केंद्र आणि खाद्य या दोन्हीचे उत्पादन महाराष्ट्रातच असले पाहिजे. यासाठी ती व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पुढील सहा महिन्यांत सरकारकडून काम केले जाणार आहे. सध्याच्या ज्या मत्स्यबीज केंद्राचा वापर होत नाही किंवा गैरवापर होतो ते कोणाचेही असले तरीही काढून शासनाकडे घेतले जाईल.’’.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Wayanad: राहुल गांधींचे ठरले! अखेर वायनाडचा 'हात' सोडला

युएसएला मिळालं बक्षीस! मात्र सुपर 8 मधून बाहेर पडूनही पाकिस्तान 'या' कारणामुळं T20 World Cup 2026 साठी थेट पात्र

Samata Parishad : छगन भुजबळ वेगळी भूमिका घेणार? समता परिषदेच्या बैठकीत कार्यकर्त्यांची मागणी?

T20 World Cup: अमेरिकेकडून खेळणाऱ्या हरमीतने रोहितच्या कोचला दिलं श्रेय! म्हणाला, 'त्यांनीच माझ्यात...'

Mumbai Local : गुड न्यूज! मुंबई लोकल धावणार 'टाईम टू टाईम', रेल्वेकडून 'हे' मोठे बदल

SCROLL FOR NEXT