Folklore in maharashtra in problem pension 
कोल्हापूर

लोककलावंतांवर आली उपासमारीची वेळ ; सरकारकडून मदतीची अपेक्षा

शामराव गावडे

नवेखेड (सांगली) - राज्यातील 35000 लोककलावंतांची तीन महिन्याचे मानधन रखडल्याने या कलावंतांच्या वर  उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने तात्काळ हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी या कलावंताने सरकारकडे केली आहे. 

राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या  वतीने वयोवृद्ध कलावंतांना मासिक मानधन दिले जाते.  त्या कलाकाराने त्या कलेत आपले आयुष्य घालविलेली असते. त्यासाठीचे उत्तरदायित्व म्हणून राज्य सरकार या कलावंतांना मासिक मानधन देते. यात भजन,कीर्तन,भेदीक, धनगरी, ओव्या,शाहिरी तर मोठ्या प्रमाणात तमाशा कलावंत आहेत. सध्या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र  लॉक डाऊनची स्थिती असल्याने गावोगावच्या जत्रा - यात्रा व इतर करमणुकीचे कार्यक्रम बंद झाल्याने या कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक वृद्ध कलावंत मधुमेह, रक्तदाब या आजाराने त्रस्त आहेत. त्यांच्याकडे औषध उपचारासाठी पैसे नाहीत, त्यातच जानेवारी ते मार्च या तीन महिन्याचे  कलावंत मानधन रखडल्याने बुडत्याचा पाय खोलात अशी अवस्था झाली आहे. मध्यंतरी तमाशा कलावंत नारायणगाव धुळे अपघातग्रस्त झाले होते त्यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लक्ष घालत कलावंतांना घरी परतण्याची व्यवस्था केली होती. दरम्यान या रखडलेल्या कलावंत मानधन प्रश्नी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी लक्ष घालावे. या लोककलावंतांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी या कलावंतांनी केली आहे. 

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना या लोककलावंतांच्या बद्दल कळवळा आहे. त्यांनी याप्रश्नी लक्ष घातल्यास हा प्रश्न चुटकीसरशी सुटू शकतो.  - संभाजी राजे जाधव, अध्यक्ष पट्टे बापूराव लोकनाट्य मराठी तमाशा परिषद महाराष्ट्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OYO Hotels: ओयो हॉटेलमध्ये एक तासात नेमकं काय होतं? सरकार अभ्यास करणार? सुधीर मुनगंटीवरांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

ENG vs IND: इंग्लंडच्या रस्त्यावर आकाश दीपचा दरारा! इंग्रज गात आहेत नवा नारा; Video व्हायरल

Stock Market Closing: सेन्सेक्स 9 अंकांच्या वाढीसह बंद; FMCG आणि रिअल्टी शेअर्स वधारले, 'हे' शेअर्स बनले टॉप गेनर्स

Xi Jinping: जिनपिंग यांच्या अधिकारात बदल शक्य; विकेंद्रीकरणाचे माध्यमांत वृत्त; नेतृत्वाच्या बदलाचीही रंगली चर्चा

SCROLL FOR NEXT