Gadhinglaj Crime News esakal
कोल्हापूर

WhatsApp वर मेसेज करून माजी सरपंचानं विष पिऊन संपवलं जीवन; Message मध्ये लिहिलं, महिलेला हाताशी धरून...

Gadhinglaj Crime News : संशयितांना अटक करा; अन्यथा पोलिस ठाण्यासमोर किंवा संशयितांच्या घरासमोर मृतदेह दहन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.

सकाळ डिजिटल टीम

पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून पाटील यांचा शोध घेतला. घरापासून एक किलोमीटरवर असलेल्या गणेश मंदिराजवळील डोंगरात ते अत्यवस्थ स्थितीत आढळले.

नेसरी : हडलगे (ता. गडहिंग्लज) येथे गावातील व्हॉटस् ॲप ग्रुपवर (Whatsapp Group) मॅसेज टाकून माजी सरपंचाने (Former Sarpanch) विष पिऊन आत्महत्या केली. विष्णू रामा पाटील (वय ६६) असे त्यांचे नाव आहे. उपचार सुरू असताना त्यांचा काल सकाळी मृत्यू झाला. पोलिसांनी मेसेजमध्ये समाविष्ट असलेल्या गावातीलच पाचजणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत नेसरी पोलिसांनी (Nesari Police) दिलेली माहिती अशी : कृष्णा भावकू पाटील, शिवराज लक्ष्मण पाटील, ज्ञानदेव सुबराव पाटील, रघुनाथ जानबा पाटील, संजय विठ्ठल पाटील अशी संशयितांची नावे आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच हडलगेत कडक पोलिस बंदोबस्त होता. संशयिताना अटक करण्यासाठी आक्रमक नातेवाईक व ग्रामस्थांनी नेसरी पोलिस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली होती. यामुळे तणावाचे वातावरण होते.

संशयितांना अटक करा; अन्यथा पोलिस ठाण्यासमोर किंवा संशयितांच्या घरासमोर मृतदेह दहन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. यावेळी पोलिस उपअधीक्षक रामदास इंगवले, चंदगडचे निरीक्षक विश्वास पाटील, नेसरीचे सहायक निरीक्षक आबा गाढवे उपस्थित होते. श्री. इंगवले यांनी लवकरात लवकर संशयितांना अटक करून कारवाईची ग्वाही दिल्यानंतर नातेवाईक व ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेऊन सायंकाळी अंत्यविधी केले.

पाटील यांचे गावात रेशन दुकान असून, रेशन दुकानदार संघटनेच्या अध्यक्षपदासह गावचे सरपंच म्हणूनही त्यांनी काम केले आहे. रविवारी (ता. १५) रात्री आठ वाजून चार मिनिटांनी त्यांनी गावातील व्हॉटस् ॲप ग्रुपवर त्रासाला कंटाळून व प्रतिष्ठेला घाबरून आत्महत्या करीत असल्याचा मेसेज टाकला. गावात या मेसेजची चर्चा सुरू झाली. त्याची माहिती मिळताच नेसरी पोलिसांनी हडलगे गाठले.

पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून पाटील यांचा शोध घेतला. घरापासून एक किलोमीटरवर असलेल्या गणेश मंदिराजवळील डोंगरात ते अत्यवस्थ स्थितीत आढळले. त्यांना नेसरीत प्रथमोपचार करून गडहिंग्लजच्या खासगी दवाखान्यात दाखल केले. उपचार सुरू असतानाच आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रदीप विष्णू पाटील यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

काय आहे मेसेज...

नेसरी पोलिसांनी पाटील यांच्या मेसेजबाबत दिलेली माहिती अशी : गावातील भावेश्वरी ग्रामप्रतिष्ठान या व्हॉट्स् ॲप ग्रुपवर मृत पाटील यांनी टाकला. तो असा : कृष्णा भावकू पाटील, शिवराज ल. पाटील, ज्ञानदेव सुबराव पाटील, रघुनाथ जानबा पाटील, संजय विठ्ठल पाटील यांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. ते एका महिलेला व तिच्या मुलाला हाताशी धरून मला बदनाम करीत आहेत. म्हणून मी माझ्या प्रतिष्ठेला घाबरून आत्महत्या करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस! पवई तलाव ओव्हरफ्लो, ७ जलाशयातील पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट समोर

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

Jagannath Puri Rath Yatra 2026: कधी आहे जगन्नाथ पुरी रथयात्रा 2026? जाणून घ्या योग्य तारीख, महत्त्व आणि परंपरा

तेजश्री प्रधानला रिप्लेस करणारी अभिनेत्री होणार आई; समुद्रकिनारी फोटोशूट करत दाखवला बेबी बंप, तुम्ही ओळखलंत का?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

SCROLL FOR NEXT