beating sakal
कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक, खासगी उमेदवाराची फ्रिस्टाईल हाणामारी

पगाराचे पैसे कधी देणार म्हणून जाब विचारणाऱ्या खासगी उमेदवाराला लिपिकाने शिवीगाळ केली. त्यानंतर शिवी का देतोस? म्हणून लिपिक आणि खासगी उमेदवार यांच्यामध्ये फ्रिस्टाई हाणामारी झाली.

सुनील पाटील

पगाराचे पैसे कधी देणार म्हणून जाब विचारणाऱ्या खासगी उमेदवाराला लिपिकाने शिवीगाळ केली. त्यानंतर शिवी का देतोस? म्हणून लिपिक आणि खासगी उमेदवार यांच्यामध्ये फ्रिस्टाई हाणामारी झाली.

कोल्हापूर - पगाराचे पैसे कधी देणार म्हणून जाब विचारणाऱ्या खासगी उमेदवाराला (Private Candidate) लिपिकाने (Clark) शिवीगाळ केली. त्यानंतर शिवी का देतोस? म्हणून लिपिक आणि खासगी उमेदवार यांच्यामध्ये फ्रिस्टाई हाणामारी (Fighting) झाली. त्यानंतर त्या उमेदवाराने लिपिकाच्या डोक्‍यात थेट खुर्ची घातली. त्यामुळे लिपिकाच्या डोक्‍याला दोन ते तीन टाके पडले आहेत. वास्तविक ज्याला मारहाण (Beating) झाली त्या लिपिकानेचे खासगी उमेदवाराला काम दिले होते, आज त्याच उमेदवाराने आपल्या "गुरू'ला "प्रसाद'दिल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरप्रशासन विभागात खळबळ उडाली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापासून काही अंतरावर असणाऱ्या नगरप्रशासना विभागामध्ये दुपारी दिडच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात काम करणार खासगी उमेदवार आला. त्याने तिथे असणाऱ्या लिपिकाला आपला 8 हजार रुपये पगार अद्याप का दिलेला नाही, असा सवाल केला. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली.

चकमकीत त्या लिपिकाने उमेदवारला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिव्या का देतोस म्हणून दोघांमध्ये जोरदार झटापट सुरु झाली. नगरप्रशासनामध्ये असणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. याठिकाणी महिलाही काम करतात, त्यांचीही भितीने गाळण झाली. शेवटी हाणामारी करणाऱ्या लिपिक आणि उमेदवाराला तेथील कर्मचाऱ्यांनी अडवून एकमेकांपासून दूर लोटले.

उमेदवाराने केलेल्या मारहाणीत जखमी झालेला लिपिकाला दोन ते तीन टाके पडल्याचे समजते. तो रक्तबंबाळ होवूनच दवाखाण्यात गेला. दवाखान्यातून तो पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात आला होता. पण प्रसार माध्यमाचे लोक याबद्दल विचारणा करत असल्याचे समजता त्याने तेथून काढता पाय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : रेल्वे तिकीट तपासणीला आता बॉडी कॅमेऱ्याची नजर! १५ बॉडी कॅमेरे, ३० खास जॅकेट; एसी लोकलमध्ये विशेष देखरेख

‘गौतम गंभीर चांगला माणूस आहे, पण कोच म्हणून...’; हरभजन सिंगच्या या वक्तव्याने क्रिकेटविश्वात चर्चांना उधाण; नेमकं काय म्हणाला?

Sakal Tourism Expo 2026 : पुणेकरांना मिळणार पर्यटनाची मेजवानी! ‘सकाळ टुरिझम एक्स्पो २०२६’ २१ ते २३ ऑगस्टदरम्यान

Sakal Impact : ३ हजार ५६ विद्यार्थ्यांना दिलासा! कचरावेचकांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीचा मार्ग अखेर मोकळा; ३० सप्टेंबरपर्यंत खात्यात जमा होणार शिष्यवृत्ती

Koyana Dam Water Release : कोयना धरणातून पाणी सोडण्यात येणार; कृष्णा-कोयना नदीकाठी सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT