Gadhinglaj Has More Non Covid Patients But Less Beds Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

गडहिंग्लजला नॉन कोविड रूग्ण जास्त, बेड कमी

अजित माद्याळे

गडहिंग्लज : कोरोना कालावधीत उपजिल्हा रूग्णालयाला शंभर टक्के समर्पित कोविड हॉस्पीटल म्हणून घोषित केले. त्यानंतर नॉन कोविड रूग्णांची मोठी अडचण झाली. कोरोना कमी झाला आणि 50 टक्के क्षमतेने नॉन कोविड रूग्णांची सेवा सुरू झाली. 50 बेड क्षमतेच्या या वॉर्डात सध्या 72 रूग्ण आहेत. याउलट 50 बेडेड कोविड वॉर्डात केवळ सहाच रूग्ण आहेत. ही परिस्थिती पाहून आता तरी शंभर टक्के क्षमतेने नॉन कोविड रूग्णांसाठी हे हॉस्पीटल सुरू करावे, अशी मागणी सर्वसामान्यांतून जोर धरत आहे. 

कोरोना संसर्ग वाढत असल्याचे लक्षात येताच सीपीआरवरील ताण कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जुलै-ऑगस्ट दरम्यान शंभर खाटांच्या उपजिल्हा रूग्णालयाला समर्पित कोविड हॉस्पीटल म्हणून घोषित केले. याठिकाणी अत्यवस्थ व ऑक्‍सीजनची आवश्‍यकता असणाऱ्या रूग्णांवर उपचार होवू लागले. मात्र, दुसऱ्या बाजूला नॉन कोविड सर्वसामान्य रूग्णांची या कालावधीत मोठी हेळसांड झाली. विशेष करून प्रसुती विभागच बंद झाल्याने गरोदर मातांची पंचाईत झाली. सर्वसामान्यांना आधारवड ठरलेल्या या हॉस्पीटलचे दरवाजे दोन महिने नॉन कोविड रूग्णांसाठी बंद राहिले. 

कोरोनाचा आलेख कमी आल्यानंतर उपजिल्हा रूग्णालयात 50 टक्के क्षमतेने नॉन कोविड रूग्णांवर उपचार सुरू करण्यास परवानगी दिली. म्हणजेच 50 बेड वॉर्डमध्ये रूग्णांना दाखल करण्याची सोय झाली. मात्र हॉस्पीटल सुरू झाल्याचे कळताच रूग्णांचा ओढा वाढला. परिणामी आता 50 बेडच्या या वॉर्डात 72 रूग्ण दाखल आहेत. रूग्णांची गैरसोय होवू नये म्हणून दोन बेडमधील रिकाम्या जागेचा वापर करून अतिरिक्त बेड टाकले आहेत. 50 बेड बसतील असा हा वॉर्ड असून त्यात अतिरिक्त बेड टाकल्याचे अडचण निर्माण होत आहे. दारात येणाऱ्या रूग्णाला सेवा देण्याची जबाबदारी पार पाडत असतानाच 50 टक्के क्षमतेच्या वॉर्डमुळे कर्मचाऱ्यांनाही मर्यादा येत आहेत. 

याउलट कोरोना वॉर्डमध्ये 50 बेड आहेत. याठिकाणी 5 लक्षणे असणारे रूग्ण आणि एक कोरोना पॉझीटीव्ह असे सहा रूग्ण आहेत. ऑक्‍सीजनची गरज असलेल्या अत्यवस्थ रूग्णांसाठी कोविड वॉर्ड गरजेचा आहे. कोरोना संसर्ग कमी झाल्याने सीपीआरवरील ताणही कमी आहे. जिल्ह्यात केवळ 80 ते 90 रूग्ण ऍक्‍टीव्ह आहेत. 

बेडची व्यवस्था केली जात आहे
कोविड रूग्णांसाठी 50 बेड राखीव आहेत. नॉन कोविड रूग्णांची बेड अभावी गैरसोय होवू नये म्हणून प्रयत्न आहेत. बेडपेक्षा रूग्णांची संख्या अधिक असली तरी जागा उपलब्ध होईल तेथे बेडची व्यवस्था केली जात आहे. 
- डॉ. डी. एस. आंबोळे, वैद्यकीय अधिक्षक 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यात एकाच वेळी दोघांनी संपवले जीवन, तरुण-तरुणीचे मृतदेह सापडले, घटनेने खळबळ

Demat Account: शेअर बाजाराची क्रेझ कमी होत आहे का? डीमॅट अकाउंट बंद करण्याचे प्रमाण वाढले, काय आहे कारण?

Sanjay Shirsat: 33 देशांमध्ये गद्दारांची ओळख... बनियन अन् चड्डी... संजय शिरसाटांच्या व्हिडिओवर आदित्य ठाकरेंची खोचक टिका

IND vs ENG 3rd Test: दुखापतग्रस्त रिषभ पंतने माघार घेतल्यास ध्रुव जुरेल फलंदाजी करू शकतो का? ICC चा नियम काय सांगतो?

Satara Crime: 'विनयभंगप्रकरणी युवकास अटक'; युवतीचा सतत पाठलाग करून मानसिक त्रास

SCROLL FOR NEXT