Gadhinglaj Panchayat Samiti  sakal
कोल्हापूर

गडहिंग्लज : तरतुदीच्या ६० टक्केच इंधन खर्च

सभा-कार्यक्रमांपुरताच वाहनांचा वापर

अवधूत पाटील -सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज (कोल्हापूर) : पंचायत समितीच्या सभापतींचे पद आमदारांच्या खालोखालचे. त्यांच्या दिमतीला शासनाचे स्वतंत्र वाहन आहे. इंधन खर्चासाठी आर्थिक तरतूद आहे. मात्र, तरतुदीच्या प्रमाणात ६० टक्केच खर्च पडला आहे. यावरून गडहिंग्लज पंचायत समितीच्या सभापतींची तालुक्यातील फिरती कमीच असल्याचे समोर येत आहे. पाच वर्षांत एकदा सत्ता, तर दोनदा सभापती बदलले; पण परिस्थिती जैसे-थे आहे. सभापतींकडून सभा आणि कार्यक्रमांपुरताच वाहनाचा वापर झाल्याचे स्पष्ट होत आहे.

त्रिस्तरीय पंचायत राज्य व्यवस्थेत जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यातील दुवा म्हणून पंचायत समितीकडे पाहिले जाते. त्यामुळे पंचायत समितीचे सभापतिपद प्रशासकीय आणि त्याहून अधिक राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचे मानले जाते. तालुक्याचे कार्यक्षेत्र असल्याने आमदारांच्या खालोखाल सभापतींना दर्जा दिला जातो. त्यांना पंचायत समितीच्या कोणत्याही आस्थापनांना भेटी देण्याचे, तपासणी करण्याचे अधिकार आहेत. तालुक्याच्या कारभाराला गती मिळावी, हाच यामागील हेतू आहे.

पंचायत समितीच्या सभापतींसाठी स्वतंत्र वाहन आहे. या वाहनासाठी दरवर्षी तीन हजार लिटर इंधनाची तरतूद आहे. पंचायत समितीच्या सेसमधून त्यासाठी निधी दिला जातो. असे असले तरी पाच वर्षांत झालेल्या तिन्ही सभापतींकडून वाहनांचा पुरेपूर वापर झाला नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. तरतुदीच्या ६० टक्केच इंधन त्यांच्या कार्यकालात संपले आहे. पहिल्या टप्प्यात भाजपच्या एक, तर त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी-समविचारी आघाडीचे दोन सभापती झाले; पण तिन्ही कार्यकालात परिस्थिती सारखीच असल्याचे दिसून येत आहे.

सभापतींकडून सभा, तालुक्यात विविध विभागांकडून आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांना उपस्थिती लावण्यासाठीच वाहनाचा अधिक वापर झाला आहे. त्याव्यतिरिक्त अपवाद वगळता वाहनाचा फारसा वापर न झाल्यामुळेच तरतुदीच्या ६० टक्केच खर्च पडल्याचे दिसून येते. तरतूद केली आहे तितका वापर झालाच पाहिजे, असा कोणताही नियम नाही, हे खरे असले तरी तरतुदी इतकाही खर्च होत नसेल, तर यातून फिरती कमी असल्याचे दिसून येते.

दृष्टिक्षेपात आकडे...

---------------------------------------------

सभापतींचे नाव कार्यकाल तरतुदीच्या प्रमाणात

  • जयश्री तेली - १४ मार्च २०१७ ते १ सप्टेंबर २०१८

  • विजय पाटील - १८ सप्टेंबर २०१८ ते २८ डिसेंबर २०१९

  • रूपाली कांबळे - ३० डिसेंबर २०१९ ते ---

वाहन वापर तरतुदीच्या प्रमाणात

जयश्री तेली : ३३,६७८ किलोमीटर ६२ टक्के

विजय पाटील: ३२०६८ किलोमीटर ७१ टक्के

रूपाली कांबळे: ३३,९०१ किलोमीटर ५१ टक्के

"माझ्या सभापतीच्या कार्यकालात महिन्यातील तीन आठवडे शासकीय वाहन वापरत होते. तर उपसभापतींच्या सोयीसाठी एक आठवडा खासगी वाहन वापरत होते. त्यामुळे शासकीय वाहनाचा वापर कमी दिसत आहे."

- जयश्री तेली, माजी सभापती पंचायत समिती, गडहिंग्लज

"माझा सभापतिपदाचा बहुतांश कार्यकाल कोरोनाच्या प्रादुर्भावातच गेला. कोरोनामुळे बऱ्‍याच मर्यादा आल्या. त्यामुळे फिरती कमी झाली आहे."

- रूपाली कांबळे, सभापती पंचायत समिती, गडहिंग्लज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

Mumbai Local: माकडाच्या हट्टापुढे रेल्वेही थांबली! बोरिवलीत रेल्वे वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT