Gadhinglaj Will Be Made Aware Of The Transport Issue First, Then Action Will Be Taken Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

वाहतुकप्रश्‍नी गडहिंग्लजला आधी जागृती, नंतर कारवाई होणार

अजित माद्याळे

गडहिंग्लज : विना लायसन्स, विना नंबरप्लेट, विमा नसताना आणि बिनदिक्कतपणे तिब्बल सीट घेऊन वाहन चालवणाऱ्या वाहनधारकांना आता सावध राहावे लागणार आहे. गडहिंग्लज पोलिसांकडून आधी या महिन्यात वाहतूक नियमांची जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असून, पुढील महिन्यापासून धडक कारवाई करणार आहेत, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक गणेश इंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पोलिस दिनाच्या निमित्ताने श्री. इंगळे यांनी आज पोलिस ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ""बेशिस्त वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातात मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. या पार्श्‍वभूमीवर गडहिंग्लज उपविभाग पोलिस दलातर्फे या महिन्यात वाहतूक नियमांची जनजागृती करण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे. लायसन्स नसणे, नंबरप्लेट नाही, विमा नाही किंवा तिब्बल सीट, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे आदी प्रकाराबाबत विशेष करून प्रबोधन करण्यात येणार आहे.

या महिन्यात 12 तारखेला युवा दिन आहे. त्यानिमित्त महाविद्यालयीन तरुणांसाठीही ही विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. अनेक तरुण कोणतेही कागदपत्र नसताना वाहन चालवतात. अशा युवकांना अडवून वाहन ताब्यात घेण्यात येईल. त्यांच्या पालकांना बोलावून घेऊन सूचना देऊ. वाहतूक नियमांची माहिती दिली जाईल. विभागातील बाजार भरणाऱ्या गावातही प्रबोधन होईल. गडहिंग्लजमधील फळ विक्रेत्यांचे पुनर्वसन करण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. लवकरच हा प्रश्‍न सुटेल. 

इंगळे म्हणाले, ""एसटी वाहकांनाही वाहतूक नियमांची माहिती देणार आहे. तसेच बसथांब्याच्या ठिकाणांची पाहणी करून अडचणीचे थांबे बदलण्याची कार्यवाही होईल. स्वयंसेवकांची मदत घेऊन नाकाबंदीला प्राधान्य देणार आहे. विशेष करून विना नंबरप्लेट वाहनधारकांची चौकशी होईल. यातूनच वाहन चोरीचे प्रकार उघडकीस येणार आहेत. चेन स्नॅचिंग गुन्हेही वाढत आहेत. नाकाबंदीतून असे प्रकार करणाऱ्यांना शोधणे सोपे होईल.

वाहतुकीला शिस्त लागल्यास शहराचे सौंदर्य वाढत असते. यामुळे पहिल्या टप्प्यात वाहतूक, त्यानंतर महिला आणि सायबर गुन्ह्याविषयी जनजागृती मोहीम राबवणार आहे. यासोबत अवैध धंद्याविरुद्धही धडक मोहीमही चालूच राहणार आहे. अशा कोणत्याही धंदेवाल्यांना पाठीशी घालणार नाही.'' यावेळी पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी विमा नसलेल्या वाहनांवर प्राधान्याने कारवाई सुरू करणार असल्याचे सांगितले. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे, स्वाती सूर्यवंशी उपस्थित होते. 

शहर सुंदर, पण वाहतूक बेशिस्त 
इंगळे म्हणाले, ""गडहिंग्लज शहर सुंदर आहे. येथील स्वच्छता मला आवडली, मात्र केवळ बेशिस्त वाहतुकीमुळे शहराची सुंदरता लपली आहे. यामुळे वाहतूक प्रश्‍नावर लक्ष केंद्रित करून टप्प्याटप्प्याने तो सोडवला जाईल. पालिकेशी सुसंवाद साधून पार्किंग जागा शोधण्यासह फळविक्रेत्यांचे पुनर्वसनही करण्याचा प्रयत्न आहे. 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT