gang of robbers who hijacked a lorry has been arrested by belgum police 
कोल्हापूर

'त्या' दोघांच्या तोंडात गोळा कोंबून हातपाय बांधून त्यांना कारमध्ये कोंबले अन्....

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - चालक आणि वाहकाच्या तोंडात गोळा कोंबून हातपाय बांधून त्यांचे अपरहण करत हळद वाहतूक करणारा लॉरी पळविणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला जेरबंद करण्यात आले आहे. मंगळवार (ता.16) चिकोडी पोलिसांनी ही कारवाई केली असून सात दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे. दरोडेखोरांनी 20 लाख रुपये किमतीचा ट्रक आणि 13 लाख रुपये किमतीची हळद असा एकून 33 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पळविला होता. पोलिसांनी त्यांच्याकडून हळद, लॉरीसह इतर प्रकरणातील सुमारे 1 कोटी सहा लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गणेश कल्लाप्पा कोळ, दादासाब शंकर टोणी, जनार्दन उर्फ लाला मल्हारी धेंड (तीघेही रा. पिंपळवाडी ता. कवटे महाकाळ राज्य महाराष्ट्र), गुरुनाथ नागाप्पा हालळ्ळी (रा. इटनाळ ता. रायबाग), शिवानंद सदाशिव पनदी (रा. मुगळखोड ता. रायबाग), कलीम मुसा मालदार (रा. चिंचली ता. रायबाग) आणि पांडूरंग रामाप्पा हळ्ळूर उर्फ मालदिन्नी (रा. घटप्रभा) यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, गोकाक तालुक्‍यातील पामलदिन्नी गावातून ट्रकमध्ये हळद भरलेली लॉरी घेउन चालक एम. चिन्नस्वामी वाहक पी. भुपती (दोघे रा. तामिळनाडू) हे दोघे शनिवारी (ता.6) रात्री 2.30 च्या सुमारास सांगलीकडे निघाले होते. 3.30 च्या सुमारास कब्बुरी पार करुन मुधोळ निप्पाणी महामार्ग मार्गे चिकोडीकडे जात असताना कब्बूरपासून दोन किलोमिटर अंतरावर नाल्यानजिक लॉरीच्या समोर पांढऱ्या रंगाची कार आडवी उभी करण्यात आली. कारमधील दोघेजण खाली उतरले तेवढ्यात अन्य दोघे तेथे आले आणि त्यांनी चालक व वाहकाला बुक्‍यांनी तसेच रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. दोघांच्या तोंडात गोळा कोंबून हातपाय बांधून त्यांना कारमध्ये कोंबण्यात आले. त्यानंतर कोकटनुर तुंगळ नजिकच्या नाल्यानजिक सोडून देउन 20 लाख रुपये किमतीचा लॉरी आणि 13 लाख रुपये किमतीची हळद असा एकून 33 लाख रुपयांचा मुद्देमाल घेउन पलायन केले होते. या प्रकरणी रविवार (ता.7) चालक एम. चिन्नस्वामी याने फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेउन या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथकांची स्थापना केली होती. आज वरील टोळीला अटक करण्यात पथकाला यश आले. त्यांच्याकडून दोन लॉरी, एक ट्रॅक्‍टर, दोन कार, एक पल्सर, असा एकून 1 कोटी सहा लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अन्य काही संशयित फरारी असून त्यांच्या अटकेसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या मार्गदर्शनाखाली चिकोडी व इतर सहाय्यक पथकातील अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

SCROLL FOR NEXT