The Gaur That Fell Into The Well Was Taken Out Kolhapur Marathi News
The Gaur That Fell Into The Well Was Taken Out Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

तीन तासांच्या प्रयत्नानंतर विहिरीत पडलेला गवा सुखरुप बाहेर

रणजित कालेकर

आजरा : शिरसंगी (ता. आजरा) येथील मुकुंदराव लक्ष्मण देसाई यांच्या विहीरीत जंगलातून पाण्याच्या शोधात आलेला गवा पडला होता. या गव्याला जेसीबी यंत्राच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. ग्रामस्थांच्या सहकार्याने वनविभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कष्ट घेतले. तब्बल साडेतीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर गव्याला सुखरुप विहीरी बाहेर काढण्यात आले. 

शिरसंगी जंगलातून पाण्याच्या शोधात एक गवा पहाटे गावच्या दिशेन आला. येथील देसाई यांच्या काळवट शेतातील विहीरीला पाणी पिण्यासाठी गेल्यावर अंदाज न आल्याने गवा विहीरीत पडला. देसाई हे नेहमीप्रमाणे उसाला पाणी पाजण्यासाठी विहीरीकडे गेले होते. त्यांना विहीरीत पडलेला गवा दिसला. त्यांनी याबाबतची माहिती वनविभागाला कळवली.

वनविभागाचे पथक सकाळी 9 वाजता घटनास्थळी पोहोचले. विहीर सुमारे तीस फुट खोल आहे. यामध्ये पंधरा फुट पाणी होते. त्यामुळे गव्याला विहीरीतून बाहेर काढणे अवघड होते. कुपनलिकेतील पाणी विहीरीत सोडून विहीर पाण्याने तुडूंब भरण्यात आली. जेसीबीच्या सहाय्याने विहीरीपासून सुमारे पंधरा फुट जमिनीत चर मारून गव्याला बाहेर पडण्यासाठी वाट करण्यात आली. यातून गवा बाहेर पडला व जंगलाच्या दिशेन निघून गेला.

आजरा परिक्षेत्र वनाधिकारी अमरजीत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबविण्यात आली. वनपाल डी. डी. काटकर, वनरक्षक जितेंद्र साबळे, सरपंच संदिप चौगुले, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश कानडे, वनरक्षक श्री. डफडे, वनमजूर तानाजी खांडेकर, शिवाजी मटकर शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 LIVE : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Maharashtra Exit Poll 2024 : अजित पवारांच्या पक्षाला एक्झिट पोलमधून धक्का; किती जागा मिळणार?

Latest Marathi News Live Update: लोकसभेचा शेवटचा टप्पाही उरकला; 59 टक्के मतदानाची नोंद

Baramati Exit Poll : बारामतीचा कल हाती! सुनेत्रा पवारांना धक्का, पुन्हा सुप्रिया सुळेच होणार खासदार?

Ahamadnagar Exit Poll: अहमदनगर लोकसभेत सुजय विखेंना धक्का? EXIT Pollचा अंदाज निलेश लंकेंच्या बाजूने

SCROLL FOR NEXT