Girls get self-defense lessons from women
Girls get self-defense lessons from women 
कोल्हापूर

नारी'मधून मुलींना मिळतात स्वसंरक्षणाचे धडे 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : महिला, तरुणी आणि विशेषतः किशोरवयीन मुली स्वसंरक्षणासाठी सज्ज व्हाव्यात, यासाठी शाहूवाडी तालुक्‍यातील प्राथमिक शिक्षक अनिल कांबळे यांनी "नारी' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सध्या महिलांवरील अत्याचाराच्या वाढत असलेल्या घटना पाहता किशोरवयीन मुलींनी शालेय वयातच कराटे, ज्यूदो, तायक्वांदो आत्मसात करणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन स्वसंरक्षणाचे धडे देणारा हा चित्रपट मुलींना आत्मबळ देणारा ठरत आहे. 

श्री. कांबळे शाहूवाडी तालुक्‍यातील कांटे प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. समाजात अल्पवयीन, किशोरवयीन मुली यांच्यावरील अत्याचाराचे वाढते प्रमाण पाहून त्यांनी प्रबोधनात्मक संदेश देणारा चित्रपट बनविण्याचे ठरविले. स्वसंरक्षणासाठी कराटे, ज्यूदो, तायक्वॉंदो असे संरक्षक खेळ मुलींनी आत्मसात करावेत, यासाठी या चित्रपटाची निर्मिती केली.

यात विकृत मनोवृत्तीची शिकार बनलेल्या स्वतःच्या मुलीला न्याय मिळावा म्हणून बापाची होणारी तळमळ आणि शेवटी स्वसंरक्षणासाठी पोटच्या मुलीला उभी करण्याचा संघर्षमय प्रवास या कथानकावर हा चित्रपट आधारलेला आहे. दोन तासांचा हा चित्रपट श्री. कांबळे यांनी स्वखर्चातून केला आहे. वाड्या-वस्तींवरील मुलींना स्वसंरक्षणाचे महत्त्व कळावे यासाठी शाळांत हा चित्रपट मोफत दाखविला जातो. रत्नागिरी जिल्ह्यातील हौशी कलाकारांना घेऊन हा चित्रपट बनविला आहे. तसेच कराटे, तायक्वॉंदो हे खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची निवड या चित्रपटासाठी केली आहे. 

सर्व शाळांत चित्रपट दाखविण्यासाठी प्रयत्नशील 
जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थिनींना "नारी' हा चित्रपट दाखविण्यात यावा, यासाठी अनिल कांबळे प्रयत्नशील आहेत. शाहूवाडी पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत हा चित्रपट शाळेत दाखविण्याबाबत ठराव केला आहे. 

कबड्डी, खो-खो, लंगडी या पारंपरिक खेळांसोबतच कराटे, ज्यूदो, तायक्वॉंदो या खेळांना अभ्यासक्रमात स्थान देणे ही काळाची गरज आहे. जेणेकरून किशोरवयीन मुली कठीण प्रसंगात स्वत:चे संरक्षण करू शकतील. जागृती व प्रबोधनासाठी हा चित्रपट शाळा, महाविद्यालयांत विद्यार्थिनींना दाखविण्यात येत आहे. 
- अनिल कांबळे, शिक्षक, कांटे. 

 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT