gokul election update mahadevrao mahadik raju shetty and ulhas patil visit political marathi news 
कोल्हापूर

Video : महाडीकांकडून भेटीगाठी सुरू; शेट्टी, उल्हास पाटील यांना घातली गळ पाहा व्हिडीओ

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : गोकुळच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना, माजी आमदार महादेवराव महाडीक यांनी शिरोळ येथील माजी खा राजु शेटटी व माजी आमदार उल्हासदादा पाटील यांची सदिच्छा भेट घेवुन सत्ताधारी गटास मदत करा असे आवाहन केले. 

माजी आमदार महादेवराव महाडीक, यांनी बुधवारी सकाळी, माजी खा शेटटी यांच्या निवासस्थानी जावुन, गोकुळच्या निवडणुकीबाबत चर्चा केली. ही चर्चा बंद खोलीत झाली. महाडीक यांनी , सत्ताधारी गटाबरोबर शेट्टी यांनी रहावे अशी विनंती केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सर्व ठराव धारकांशी चर्चा करुन निर्णय घेवु अशी भुमिका शेट्टी यांनी महाडीक यांच्यासमोर मांडली. 

शेट्टी यांच्या भेटीनंतर, महाडीक यांनी, माजी आमदार उल्हासदादा पाटील यांची भेट घेतली. याप्रसंगी तालुक्‍यातील सुमारे 25 ठरावधारक उपस्थित होते. ठरावधारकांच्या समोर बोलताना, महाडीक म्हणाले, सत्ताधारी यांनी दुधउत्पादकांना, नेहमीच न्याय दिला आहे. यामुळे सर्वांनी सत्ताधारी गटाच्या पाठिशी रहावे असे आवाहन केले. यानंतर महाडीक व पाटील यांची बंद खोलीत चर्चा झाली. दुध उत्पादक व सर्व सामान्य जनता यांचा विचार करुन, आपण निर्णय घेवु असे आश्‍वासन पाटील यांनी यावेळी दिले.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident: ताम्हिणी घाटातल्या गूढ अपघाताचा उलगडा… कोकणातून हॉटेल चालकाचा फोन ठरला टर्निंग पाईंट! नाहीतर...

Kolkata Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने कोलकाता हादरले; लोक घाबरून घरं सोडून पळाले; बांगलादेशातही बसले हादरे

Latest Marathi News Live Update : कोळसा घोटाळ्याप्रकरणी ईडीची मोठी कारवाई: हावडा-दुर्गापूरमध्ये २४ ठिकाणी छापे

Ashes 2025 England vs Australia : खरोखरची राख असलेली 'अ‍ॅशेस ट्रॉफी' आता कुठं आहे? त्यात नेमकी कशाची राख आहे? जाणून घ्या...

Girija Oak Favorite Dish: नॅशनल क्रश गिरीज ओकचं सीक्रेट रिव्हील! नागपूरची ही एक वडी… जिचं नाव ऐकून स्टारचंही मन हरवलं!

SCROLL FOR NEXT