The government will tell, then the school will start ... 
कोल्हापूर

शासन सांगणार, तेव्हाच शाळा सुरू होणार... 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले आहे. मात्र, कोरोनामुळे शाळा सुरु करण्याबाबत शासनस्तरावर निर्णय प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे शासन जेव्हा मार्गदर्शक सुचना करेल तेव्हाच शाळा सुरु करण्यात येतील, अशी माहिती शिक्षण सभापती प्रवीण यादव व मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिली. तसेच जिल्हा परिषद शाळातील शिक्षक, विद्यार्थ्यांना ड्रेसकोड निश्‍चित केला असल्याचेही सांगण्यात आले. जिल्हयातील सर्व शिक्षक संघटनांची समन्वय समितीची बैठक झाल्यानंतर ही माहिती देण्यात आली. 

नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले असले तरी शिक्षकांना सदर कालावधीत शाळेत उपस्थित राहण्यासाठी कोणत्याही प्रकारची सक्ती केली जाणार नाही. मात्र, ऑनलाईच्या माध्यमातून मोबाईल ऍपव्दारे विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच प्राथमिक शाळा सुरु करण्यापुर्वी ज्या शाळांचा वापर क्वारंटाईनसाठी केला आहे, त्या शाळा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यात याव्यात तसेच हे निर्जंतुकीकरण केल्याशिवाय या शाळा ताब्यात घेवू नयेत, अशा सुचना या बैठकीत देण्यात आल्या . 

शाळांचे निर्जंतुकीकरण करण्याबाबत ग्रामपंचायतीला जरुर त्या सुचना दिल्या जातील, असे मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी दिली. ज्या शिक्षकांची कोविड 19 अंतर्गत सर्वेक्षण व अन्य कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या शिक्षकांच्या नियुक्ती रद्द करण्याबाबत जरुर तो पाठपुरावा करणेची कार्यवाही टप्याटप्याने सुरु असल्याचेही सांगण्यात आले. शिक्षक संघटनांनी कोरोना योद्धा म्हणून काम करत असलेल्या कोणत्याही शिक्षकांवर कारवाई करु नये अशी मागणी केली . 

बैठकीस शिक्षणाधिकारी आशा उबाळे, शिक्षक समन्वय समितीचे मोहन भोसले, सतिश बरगे, संभाजी बापट, राजाराम वरुटे, नामदेवराव रेपे, प्रसाद पाटील, सुनिल पाटील, रवि पाटील, प्रमोद तोडकर संघटना पदाधिकारी तसेच विस्तार अधिकारी जयश्री जाधव उपस्थित होत्या. 

असा आहे ड्रेस कोड... 
जिल्हयातील सर्व विद्यार्थ्यांना पिंक कलरचा शर्ट व ब्लू कलरची पॅन्ट असा ड्रेसकोड निश्‍चित केला आहे. तसेच शिक्षकांसाठी सोमवार, मंगळवार या दिवशी पिस्ता कलरचा शर्ट, ब्लॅक पॅन्ट व गुरुवार आणि शुक्रवारी स्काय ब्लू व ब्लॅक पॅन्ट असा ड्रेस कोड निश्‍चित करण्यात आला आहे. त्याप्रमाणे महिला शिक्षकांसाठी त्याप्रमाणे साडी व शिक्षकांच्या मागणीनुसार , बुधवार व शनिवार हे दिवस ड्रेसकोड मधून वगळण्यात आले. 

दृष्टिक्षेप 
- जिल्हा परिषदेच्या विद्यार्थी, शिक्षकांसाठी ड्रेसकोड निश्‍चित 
- शिक्षकांना शाळेत उपस्थितीबद्दल सक्ती नाही 
- ऑनलाईन ऍपद्वारे विद्यार्थ्यांच्या संपर्कात 
- क्वारंटाईन केलेल्या शाळा पूर्णपणे निर्जुंतुकीकरण होणार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CIDCO: सिडको थकबाकीदार! नवी मुंबई पालिकेकडून मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू

Shiroli MIDC : शिरोली एमआयडीसीत ऑईल दुकानाला भीषण आग; अग्निशमन दलाची धावपळ

Numerology : 'या' 2 मूलांकाच्या लोकांना कधीच सांगू नका तुमचे सिक्रेट; सरड्यासारखे रंग बदलून जगापुढे करतात तुमची नाचक्की

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या आदिवासी आयुक्तालय बाहेर आदिवासी विद्यार्थ्याचा ठिय्या

Kolhapur City Boundary Expansion : कोल्हापूर शहराची हद्दवाढ २०२७ पर्यंत होणार नाही, खरं कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT