guardian minister satej patil facilitated to doctor atharva gondhali in kolhapur on the occasion of independence day 
कोल्हापूर

विश्वविक्रमवीर डॉ. अथर्वचा पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील विश्वविक्रमवीर डॉ. अथर्वने वयाच्या 14 व्या वर्षी 30 नोव्हेंबर 2019 रोजी बारा तासात 296 किलोमीटर अंतर सायकलिंगमध्ये पूर्ण करून कोल्हापूरमध्ये विश्वविक्रम केला होता. याची दखल घेऊन 'द डायसेस ऑफ एशिया इन इंडिया चेन्नई, तामिळनाडू' यांच्याकडून त्याला 'डॉकटरेट इन एथलेटिक' ही पदवी बहाल केली होती.

काल भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 व्या वर्धापनदिनानिमित्त 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा पार पडला. यावेळी सायकलिंगमध्ये डॉक्टरेट मिळाल्याबद्दल डॉ. अथर्व गोंधळीचा पालकमंत्र्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

डॉ. अथर्व हा लहानपणापासून विविध खेळांमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवत आला आहे. 2019 मध्ये ताय क्वांनदो, लुडो, सायकलिंग, ट्रायलिथॉन अशा विविध खेळांमध्ये त्यांने पारितोषिके पटकावली आहेत. सध्याही तो विविध खेळांमध्ये अग्रेसर आहे. सायकलिंगमध्ये त्याने केलेल्या विश्वविक्रमाची नोंद ही ग्लोबल रेकॉर्ड, चिर्ल्डन वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड, एशिया पॅसिफिक रेकॉर्ड आणि नॅशनल रेकॉर्ड असे 6 विक्रमांमध्ये झाली होती. याचीच दखल ही 'द डायसेस ऑफ एशिया इन इंडिया चेन्नई तामिळनाडू' यांनी घेऊन त्याला 'डॉकटरेट इन एथलेटिक' ही पदवी बहाल केली होती. त्यामुळे आज त्याचा पालकमंत्री सतेज पाटील यांनी सत्कार केला.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, महापौर निलोफर आजरेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तान UAE ला पराभूत करत 'सुपर फोर'मध्ये! भारताविरुद्ध पुन्हा होणार सामना, पण कधी अन् केव्हा? जाणून घ्या

Athletics Championship 2025: नीरज चोप्रा विरुद्ध अर्शद नदीम लढत होणार! जाणून घ्या कुठे अन् किती वाजता पाहाता येणार फायनल

PAK vs UAE: पाकिस्तानी विकेटकिपरच्या थ्रोमुळे अंपायरला मोठी दुखापत, मैदानंच सोडावं लागलं; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

SCROLL FOR NEXT