gudi padwa festival celebration in kolhapur marathi news
gudi padwa festival celebration in kolhapur marathi news 
कोल्हापूर

चिव्याची काठी, साखरेच्या माळा, रेडिमेड साडी, कलश अन्‌ मिनी गुढी 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडवा सणानिमित्त शहरातील बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. चिव्याची काठी, साखरेच्या माळा, फळे, फुले, चाफ्यांची माळ, कलश, मिनी गुढीसह अन्य वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. विकेंड लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर गुढीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी अनेकांनी बाजारात गर्दी केली. 

अवघ्या चार दिवसांवर गुढीपाडवा आल्यामुळे बाजारपेठेत नवीन वस्तू खरेदीसाठी उधाण आले आहे. पाडव्यानिमित्त वस्तू खरेदी करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून ग्राहक चौकशीसाठी शोरूममध्ये येत आहेत. गुढीसाठी शहरातील बिंदू चौक, दसरा चौक, मिरजकर तिकटी, टिंबर मार्केट या ठिकाणी चिव्यांचे ढीग लागले आहेत. 80 ते 150 रुपयांप्रमाणे या चिव्यांची विक्री होत आहे. अमावस्येआधी गुढीची काठी नेण्याची प्रथा असल्याने तसेच विकेंड लॉकडाउनमुळे आजच चिव्याची काठी व इतर साहित्य नेण्याकडे अनेकांचा कल होता. शहरातील ठिकठिकाणी साखरेच्या माळांची विक्रीही मोठ्या प्रमाणात होत आहे. एका माळेची किंमत 20 ते 50 रुपये आहे. गुढीसाठी ब्लाऊज पीस, साडी अशी वस्त्रे वापरली जात असली तरी खास गुढीसाठी भरजरी आणि जरीकाठेच्या साड्या बाजारात आल्या आहेत. 

मिनी गुढी 
नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहाने करण्यासाठी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्यांनी मिनी गुढी खरेदीला पसंती दिली आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून मिनी गुढीची मागणी वाढत आहे. ही गुढी साधारण 150 ते 250 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. 

गुढीची साडीही रेडिमेड 
गुढी उभी करताना साडी, भरजरी ब्लाऊज पीसचा वापर करतात. साडीचा वापर करताना तिची व्यवस्थित घडी घालणे आवश्‍यक असते. गडबडीच्या वेळी वेळ वाचविणारी तसेच गुढीला शोभणारी डिझायनर गुढीची साडी सध्या बाजारात उपलब्ध आहे. जरी, कॉटन अशा प्रकारात साडी उपलब्ध असून ती 200 ते 250 रुपयांमध्ये मिळते. या डिझायनर साडीलाही महिला वर्गाची मोठी पसंती मिळते आहे.  

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैवाहिक संबंध नाकारणे, मुलांची जबाबदारी न घेणे मानसिक क्रूरता; दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

Mahadev Betting App: महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणी आणखी एका अभिनेत्याला अटक

IPL 2024: ईशान किशनला BCCI चा दणका, दिल्ली-मुंबई सामन्यानंतर केली मोठी कारवाई

Antarctica Penguin : ग्लोबल वॉर्मिंगमुळे नष्ट होतायत अंटार्क्टिकावरील पेंग्विन; बर्फ वितळल्यामुळे लाखो नवजात पेंग्विन्सचा मृत्यू

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

SCROLL FOR NEXT