Arrested
Arrested Sakal
कोल्हापूर

बिष्णोई टोळीच्या संपर्कातील कुख्यात गुंड मलीक जेरबंद

सकाळ वृत्तसेवा

लॅरिन्स बिष्णोई गँग व कॅनडा येथील गोल्डी ब्रार या गुन्हेगारांच्या संपर्कात असलेल्या संशयितास आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले.

कोल्हापूर - लॅरिन्स बिष्णोई गँग व कॅनडा येथील गोल्डी ब्रार या गुन्हेगारांच्या संपर्कात असलेल्या संशयितास आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले. मोहित ऊर्फ शेराजगबीरसिंग मलीक (वय २६, रा. बिधल, ता. गौहाना, हरियाणा) असे त्याचे नाव आहे. रंकाळा टॉवर परिसरात ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक संजय गोर्ले यांनी सांगितले. दरम्यान प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या खून प्रकरणाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पोलिसांनी सांगितले, की हरियाणा येथील संशयित मोहित मलीक याच्यावर शस्त्राचा वापर करून खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो कुख्यात लॅरिन्स विष्णोई गँग व कॅनडा येथील गोल्डी ब्रार यांच्या संपर्कात होता. त्याच्यावर गोहाना पोलिस ठाणे हरियाणा येथे गुन्हा नोंद आहे. तो गेल्या चार महिन्यापासून पसार होता. त्याची माहिती देण्यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक रोहतक यांनी बक्षीसही जाहीर केले होते. तो कोल्हापूर शहरात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना मिळाली. त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तयार करून त्याला ताब्यात घेण्याचे आदेश दिले. तो रंकाळा टॉवर परिसरात येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यांनी हरियाणा पोलिसांशी संपर्क साधून त्याची माहिती व छायाचित्र मिळवले. त्यानंतर रंकाळा टॉवर येथे सापळा लावला. शोध घेताताना तो पदपथावर मिळून आला. त्याला पोलिसांनी सापळा रचून पकडले. त्याने पळून जाण्याचा प्रयत्नही केला. मात्र त्याला यश आले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

SCROLL FOR NEXT