Hasan Mushrif Vs Sharad Pawar esakal
कोल्हापूर

Hasan Mushrif : शरद पवार कोल्हापुरात येताच मुश्रीफांच्या डोळ्यात पाणी; म्हणाले, 'आम्ही पवार साहेबांसोबत नाही याचं दुःख होतंय'

'उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एनडीएमध्ये आहे हेच खरे आहे'

सकाळ डिजिटल टीम

'गेल्या ४० वर्षांत श्री. पवार कोल्हापुरात आलेत आणि मी त्यांच्यासोबत नाही असे कधीच झाले नाही.'

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) कोल्हापुरात असूनही आपल्याला त्यांची भेट घेता येत नाही, असे सांगतानाच राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री प्रसारमाध्यमांशी बोलताना भावनाविवश झाले. गेल्या ४० वर्षांत हे प्रथमच घडत असल्याचे सांगतानाच त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत काल दसरा चौकात सभा झाली. याबाबत शासकीय विश्रामगृहावर थांबून असलेल्या मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना विचारले असता ते म्हणाले, ‘गेल्या ४० वर्षांत श्री. पवार कोल्हापुरात आलेत आणि मी त्यांच्यासोबत नाही असे कधीच झाले नाही. मात्र, आज त्यांची भेट होत नाही. परिस्थितीनुसार आम्ही निर्णय घेतलेला आहे.

हा निर्णय का घ्यावा लागला हे त्याचे विवेचन आम्ही केलेले आहे. आज ते कोल्हापुरात येत असताना आम्ही त्यांच्यासोबत नाही याचे दुःख होते. काही निर्णय आम्ही घेतले असले तरी श्री. पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एनडीएमध्ये आहे हेच खरे आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT