Hasan Mushrif speaking at a political rally in Gadhinglaj, addressing allegations against opposition leaders. esakal
कोल्हापूर

Hasan Mushrif: “हा राजा का भिकारी…”; हसन मुश्रीफांची समरजितसिंह घाटगेंवर बेताल टीका

Mushrif Highlights Issues of Corruption and Calls for Voter Awareness: विरोधकांचे विचार व प्रवृत्ती लोकांसमोर ठेवणे आवश्यक आहे, असे देखील मुश्रीफांनी म्हटले त्यामुळे आता कागल विधानसभेची लढाई संघर्षाची होणार असल्याची शक्यता आहे.

Sandip Kapde

कोल्हापूर: गडहिंग्लज येथे आयोजित सभेत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी समरजितसिंह घाटगे यांच्यावर तीव्र टीका केली. “हा राजा का भिकारी…!” अशी टीका करत मुश्रीफांनी घाटगेंनी अधिकाऱ्यांच्या बदलींच्या कामात ‘दलाली’ केल्याचा आरोप केला. मुश्रीफ म्हणाले की, घाटगे प्रत्येक आठवड्यात ३० ते ३५ कामांची यादी घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जात असत आणि यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची प्रक्रिया होती.

मुश्रीफ म्हणाले, “अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी पत्रे घेऊन फडणवीसांकडे जाणे हे मला निष्ठा शिकवणार आहे का?” यावेळी त्यांनी शरद पवार यांचे नाव घेतले आणि स्पष्ट केले की, ते पवार साहेबांना गुरुदक्षिणा देऊन बाहेर पडले. यावेळी त्यांनी गडहिंग्लजमध्ये मंजूर १६ कोटींच्या निधीतून विविध विकासकामांचा प्रारंभ केला आणि ११० कोटींच्या कामांचे लोकार्पण केले.

आमदार होण्यासाठी हिम्मत हवी असते, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. “दुसऱ्यांना त्रास देऊन आमदार होता येत नाही, त्यासाठी तुम्हाला हिम्मत लागते,” असेही त्यांनी नमूद केले. मुश्रीफ यांचा आरोप होता की, विरोधक राजे ईडीच्या मदतीने त्यांना त्रास देत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना भूमिका बदलावी लागली आहे.

त्यांच्या भाषणात त्यांनी असं म्हटलं की, “दलितांची जमीन हडपणारे आणि कामगारांच्या चुलीत पाणी ओतणारे विरोधक आहेत. जनतेने दोन्ही प्रवृत्त्या तपासून डोळे उघडून मतदान करावे.”

विरोधकांचे विचार व प्रवृत्ती लोकांसमोर ठेवणे आवश्यक आहे, असे देखील मुश्रीफांनी म्हटले त्यामुळे आता कागल विधानसभेची लढाई संघर्षाची होणार असल्याची शक्यता आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT