Heart disease accounts for 40 percent of coronary heart disease deaths 
कोल्हापूर

कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूत  40 टक्के मृत हृदयरोगाचे 

ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर  : कोरोनामुळे जिल्ह्यात 326 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील 40 टक्के कोरोनाग्रस्तांना हृदयविकाराचा त्रास होता. 
कोविड विषाणूमुळे रक्तात होणारी गुठळी हृदयाच्या वाहिन्यांकडे सरकते. यामुळे हृदयाच्या क्रियेवर परिणाम होतो. परिणामी मृत्यू ओढवतो. त्यामुळे ज्या व्यक्तींना हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह, मेंदूचे विकार असतील, त्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे, अशी माहिती हृदयरोग तज्ज्ञांनी दिली. 
कोरोनाबाधितांची संख्या जिल्ह्यात दिवसागणिक वाढत आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही वाढली. मृत्यू झालेल्यांत हृदयविकाराचा धोका असणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. काही रुग्णांना कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर उपचारांदरम्यान हृदयविकार असल्याचे निष्पन्न झाले. हृदयविकारग्रस्त लोकांना कोरोनाचा धोका अधिक असून, अशा कोरोनाबाधितांचा समावेश डॉक्‍टर 
हायरिस्क रुग्णांत करतात. रक्ताची गुठळी हृदयाच्या वाहिनीकडे सरकली किंवा तेथेच झाली तर हृदयाची क्रिया बंद पडते किंवा हृदयाचे पंपिंग 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी होते. अशा काळात शरीरातील ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी असल्याने हृदयाची क्रिया थांबते आणि मृत्यू ओढवतो. 

मृत व्यक्तींतील दोष 
*एरिथमियाचा विकार- 16 टक्के 
*हृदयाची तीव्र दुखापत- 7.2 टक्के 
*कोरोनाचा धसका घेतलेले रुग्ण- 7.7 टक्के 
*मूत्रपिंडाचे विकार- 6 टक्के 

 

हृदयविकार असणाऱ्यांनी हे करावे 
* कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास धसका घेऊ नये 
* रक्त पातळ होण्याच्या गोळ्या सुरू असतील तर त्या बंद करू नयेत 
* कोरोना लक्षणे असल्यास डॉक्‍टरांशी संपर्क करावा 
* अंगावर दुखणे काढू नये 
* दिवसातून एकदा शरीरातील ऑक्‍सिजनचे प्रमाण तपासावे 

कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांत हृदयविकार असलेल्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. बहुतांश जणांना कोरोना उपचार सुरू असताना हृदयविकाराचे निदान झाले आहे. अशा व्यक्तींच्या मृत्यूला 80 टक्के हृदयविकार, तर 20 टक्के कोरोना कारणीभूत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित उपचार सुरू करताना इसीजीबरोबरच इको चाचणी करणेही आवश्‍यक आहे.
- डॉ. चंद्रकांत पाटील, हृदयरोगतज्ज्ञ 

हृदयाची क्रिया 60 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असली, तरीही रुग्णांचे प्राण वाचविता येतात. मात्र, ते 40 टक्‍क्‍यांपेक्षा कमी असेल तर मृत्यूचा धोका अधिक असतो. यासाठी कोरोनाचे कोणतेही लक्षण दिसल्यास तत्काळ डॉक्‍टरांशी संपर्क साधा. योग्य वेळी उपचार झाल्यास हृदयविकार असणाऱ्यांचा कोरोनाही बरा होतो. 
- डॉ. अक्षय बाफना, हृदयरोगतज्ज्ञ 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : भारतीय देशांतर्गत हवाई क्षेत्र जगात सर्वाधिक वेगाने विकसित होत असून सध्या ते तिसऱ्या क्रमांकावर - मोहन नायडू

SCROLL FOR NEXT