कोल्हापूर

Tauktae Cyclone Update: कोल्हापुरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस

सुनील पाटील

कोल्हापूर : सोसाट्याचा वारा आणि जोरदार पावसाने कोल्हापूर जिल्हा आणि शहराला झोडपून काढले. तौत्के चक्री वादळाचा परिणाम आज कोल्हापूर जिल्ह्यातही दिसला. जोरदार वाऱ्यामूळे ग्रामीण भागातील उसासह मोठी झाडे उन्मळून पडल्याने मोठे नूकसान झाले. शहरात शाहुपूरी, गुजराती हायस्कूल, सदर बाजार, जिल्हा परिषद कॉलनी परिसर, उद्यमनगर, फडतरे मिसळ परिसरात, जरगनगर, सरदार तालीम, राजारामपुरी 10 वी गल्लीसह इतर ठिकाणीची तब्बल वीसहून वृक्ष जोरदार वाऱ्याच्या तडाख्यामुळे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे सुदैवाने रस्त्यावर कोणतीही वाहतूक नसल्याने कोणालाही दुखापत झालेली नाही. काही घरांचे नूकसान झाले आहे. अग्निशमन दलाकडून ही सर्व झाडे रस्त्यावरुन हटविण्यासाठी मोहिम राबविण्यात आली.

दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात उन्हाचा तडाखा सहन होत नव्हता. दरम्यान, तौत्के चक्री वादळामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यालाही याचा काही प्रमाणात का असेना तडाखा बसला. आणखी दोन दिवस या चारही जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस व जोराचा वारा सुरुच राहणार आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात आज पहाटे तीनपासून जोरदार आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नागरिकांचे धाबे दणाणले आहेत. पहाटे चारच्या दरम्यान झालेल्या जोरदार वाऱ्यामुळे करवीर, शाहूवाडी, गगनबावडा तालुक्‍यातील अनेक शाळा व घरांवरील पत्रे उडून मोठे नूकसान झाले आहे.

तौत्के चक्रीवादळ राजापूरपर्यंतच

तौत्के चक्रीवादळ येणार म्हणून कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातही भितीचे वातावरण होते. दरम्यान, सकाळी 11 पर्यंत राजारापूर पर्यंतच हे वादळ जोरदार जाणवले. तर त्याचा प्रभाव कोल्हापूर, सांगली व सोलापूरपर्यंत जाणवला. कोल्हापूरमध्ये जोरदार वाऱ्यासह मूसळधार पाऊस झाला. पण राजापूरमध्ये ज्या गतीने वारे वाहिले, त्याच्या निम्यानेही कोल्हापूरमध्ये वाहिले नाही. रात्री उशिरा याचा पूर्ण पणे प्रभाव कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. कोल्हापूर जिल्हा समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंच आहे. त्यामुळे या वादळाचा थेट परिणाम कोल्हापूरवर झाला नाही. पण मूसळधार पाऊस आणि सोसाट्याच्यावाऱ्यामुळे झाडे उन्मळुन पडली तर घरांचे पत्रे उडून गेली.

उभा ऊस झोपला

ग्रामीण भागात ऑगस्टमध्ये झालेल्या ऊस लागणी आजच्या जोरदार वाऱ्यामुळे अक्षरश: झोपल्या आहेत. मॉन्सून सुरु होण्यापूर्वीच ऊस उन्मळुन पडला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात या उसाचे मोठे नूकसान होणार आहे.

उन्हाळी भाताला फटका

जिल्ह्यात सुमारे 30 हजार हेक्‍टर क्षेत्रावर उन्हाळी भात केले आहे. हे भात मे महिन्याच्या अखेरी कापणीला येते. दोन दिवस झालेल्या पावसामुळे या पिकाला काही प्रमाणात फटका बसला आहे. पाऊस असाच आणखी दोन दिवस राहिला तर मात्र निश्‍चितपणे भाताच्या लोंब्यावर परिणाम होणार आहे.

सायंकाळी 5 नंतर मूसळधार

जिल्ह्यात सायंकाळी पाच नंतर जोरदार वाऱ्यास मूसळधार पाऊस झाला. पाच ते सायंकाळी सहापर्यंत मुसळधार झालेल्या पावसाने पाणी-पाणी केले आहे. दरम्यान, त्यानंतर मात्र पावसाचा आणि वाऱ्याचाही जोर कमी झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Fact Check: 'गर्दी फक्त पाहायला येते, मतदानाला नाही...' खोट्या दाव्यासह कंगनाचा अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Hybrid Pitch In Dharamshala : हायब्रिड खेळपट्टी म्हणजे काय? धरमशालामध्ये करण्यात आले अनावरण! मुंबईसह 'या' मैदानावर लवकरच होणार प्रयोग

Latest Marathi News Live Update : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण; पाचव्या आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT