Vishalgad Kolhapur esakal
कोल्हापूर

Vishalgad : विशाळगडावर बकरी ईदला कुर्बानीसाठी High Court कडून परवानगी; या प्रथेवर सरकारने घातली होती बंदी

गेल्या वर्षी १ फेब्रुवारीला या प्रथेवर सरकारने बंदी घातली होती.

सकाळ डिजिटल टीम

परमेश्वरासाठी बळी देण्याच्या नावाखाली प्राणी-पक्ष्यांच्या बेकायदा कत्तलीवर बंदी घातल्याचे आदेश पुरातत्त्व विभागाच्या उपसंचालकांनी काढले होते.

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड (Vishalgad Kolhapur) आवारातील दर्ग्यावर पूर्वापार चालत आलेल्या पक्षी व प्राण्यांचा बळी देण्याच्या प्रथेवर प्रशासनाने घातलेली बंदी उठली आहे. या ठिकाणी बकरी ईद आणि उरूसला कुर्बानी देण्यास उच्च न्यायालयाने (High Court) परवानगी दिली आहे.

गेल्या वर्षी १ फेब्रुवारीला या प्रथेवर सरकारने बंदी घातली होती. पुरातत्त्व विभागाने (Archaeology Department) याबाबत आदेश काढला असून परमेश्वरासाठी बळी देण्याच्या नावाखाली प्राणी-पक्ष्यांच्या बेकायदा कत्तलीवर बंदी घातल्याचे आदेश पुरातत्त्व विभागाच्या उपसंचालकांनी काढले होते. त्यानंतर विविध प्रशासनांनी बंदीचे आदेश काढले.

याविरोधात हजरत पीर मलिक रेहान मीरा साहेब दर्गा ट्रस्टने ॲड. सतीश तळेकर, ॲड. माधवी अय्यपन यांच्यामार्फत याचिका केली असून त्यावर सुनावणी घेण्यात आली. सुनावणीनंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. काल (ता. १४) न्या. बी. पी. कोलाबावाला यांनी हा निकाल जाहीर केला आणि याचिकाकर्त्यांची मागणी मान्य केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe Transfer News : तुकाराम मुंढे यांची बदली होणार?, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ विधानसभेत दिली माहिती

Mumbai Crime: कुर्ल्यात धक्कादायक घटना! कोयत्याचा धाक दाखवत १० वर्षांच्या मुलासमोर विवाहितेवर अत्याचार, आरोपीला अटक

Latest Marathi News Live Update : येत्या दोन दिवसांत कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता; 'आयएमडी’चा इशारा

Venezuela Earthquake: काही मिनिटांत दोन महाभूकंप; इमारतींचे ढिगारे, १० हजार जणांचा मृत्यू झाल्याची भीती... क्षणात उद्ध्वस्त झालं शहर

Tukaram Mundhe: हॉटेलात मोफत अन् स्वच्छ पिण्याचं पाणी बंधनकारक, सुरक्षित अन्नासाठी कठोर नियम; तडजोड नाही, तुकाराम मुंढेंचा इशारा

SCROLL FOR NEXT