कोल्हापूर

प्रशासनाची दक्षता ः होम क्वारंटाईनना हमीपत्र बंधनकारक

प्रतिनिधी

कोल्हापूर : कोरोना रुग्णालयातून होम क्वारंटाईनचा (गृह अलगीकरणाचा) शिक्का मारलेल्या व्यक्तींना गावात स्वतंत्र घर, खोली किंवा वस्तीवर स्वतंत्र राहण्याची व्यवस्था असल्याचे प्रतिज्ञापत्र, हमी पत्र घेणे बंधनकारक आहे. ग्राम, प्रभाग समितीने खात्री करूनच त्यांना होम क्वारंटाईन करता येणार असल्याची सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई सर्व ग्राम तसेच प्रभाग समित्यांना आज दिले. पण बाहेरच्या जिल्ह्यातून परस्पर येणाऱ्या व्यक्तिला गावातच 14 दिवस सक्तीने संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचे आदेश दिले. 

आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग यांच्या 30 एप्रिल रोजीच्या आदेशानुसार लॉकडाउन दरम्यान स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी व वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या इतर व्यक्ती यांना शासन आदेशातील नियमांचे पालन करून त्यांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. याला अनुसरुन जिल्ह्याबाहेरुन कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना अलगीकरण करण्याबाबतची कार्यपद्धती निश्‍चित करण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. 
जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, कोरोना रुग्णालयातून होम क्वारंटाईन (गृह अलगीकरणाचा) शिक्का मारलेल्या व्यक्ती गावात आली असेल तर त्याला राहण्यासाठी स्वतंत्र घर, खोली असल्याची खात्री करावी. कोल्हापूर जिल्ह्याबाहेरुन आलेली एखादी व्यक्ती जिल्हा प्रशासनाने निश्‍चित केलेल्या कोरोना तपासणी केंद्रात न जाता परस्पर गावात, शहरात प्रवेश करीत असल्यास ग्राम समितीने संस्थात्मक अलगीकरणात करावे. त्यानंतर त्याची नजीकच्या कोव्हिड रुग्णालय, केअर सेंटर, हेल्थ सेंटर येथे जाऊन तपासणी करावी. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला तरीही अशी व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात ठेवावे. 

चालकांना स्वतंत्र खोलीत ठेवावे 
गावातील ज्या व्यक्ती वाहन चालक किंवा क्‍लिनर म्हणून काम करतात व कोल्हापूर जिल्ह्याबाहेर जातात किंवा जिल्ह्यातील बाधित क्षेत्रात ट्रक, टेम्पो, तीन चाकी गाड्या, ट्रेलर, जेसीबी, पोक्‍लेन मशीन घेऊन जातात व कोरोना बाधित व्यक्तींची संपर्कात येण्याची शक्‍यता आहे अशा व्यक्तींना ग्रामस्तरीय संस्थात्मक अलगीकरणात किंवा त्यांच्या घरी राहण्यासाठी स्वतंत्र खोली असल्यास गृह अलगीकरण करावे, अशाही सूचना श्री. देसाई यांनी दिल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT