Kolhapur Crime News esakal
कोल्हापूर

Kolhapur Crime : Share Market मध्ये गुंतवणूक पडली महागात! आर्थिक वादातून हॉटेल मालकाचा गोळी झाडून खून

चंद्रकांत पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी दत्तात्रय पाटील व सचिन जाधव यांच्याकडे काही रक्कम शेअर मार्केटमध्ये (Share Market) गुंतवण्यासाठी दिली होती.

सकाळ डिजिटल टीम

तरुणाचा खून झाल्यानंतर दोन्ही गावांतील तरुणांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी करवीर पोलिसांनी खुपिरे येथे बंदोबस्त ठेवला होता.

कोल्हापूर : दोनवडे (ता. करवीर) येथे आर्थिक वादातून हॉटेल मालकाचा (Hotel Owner) त्याच्याच हॉटेलमध्ये गावठी कट्ट्यातून गोळी झाडून काल (शनिवार) रात्री साडेनऊच्या सुमारास खून करण्यात आला. हॉटेल मालक चंद्रकांत आबाजी पाटील (वय ५५, रा. दोनवडे, ता. करवीर) असे मृताचे नाव आहे. यामध्‍ये त्यांचा मुलगा रितेश जखमी झाला.

संशयित दत्तात्रय कृष्णात पाटील (४०, रा. खुपिरे) आणि सचिन गजानन जाधव (३८, रा. खुपिरे) हे दोघे करवीर पोलिस ठाण्यात (Karveer Police Station) हजर झाले, अशी माहिती अप्‍पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनी दिली. या घटनेनंतर खुपिरे परिसरात तणावपूर्ण वातावरण होते. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चंद्रकांत पाटील यांचे दोनवडे फाटा येथे ‘गोल्डन हॉटेल, बार व लॉजिंग आहे. गेल्या दोन वर्षांपासून हॉटेल व्यवसाय बंद आहे. केवळ लॉजिंग सुरू आहे.

चंद्रकांत पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी दत्तात्रय पाटील व सचिन जाधव यांच्याकडे काही रक्कम शेअर मार्केटमध्ये (Share Market) गुंतवण्यासाठी दिली होती. यामध्ये या दोघांना नुकसान झाले होते. तेव्‍हापासून चंद्रकांत पाटील व दत्तात्रय पाटील यांच्यामध्ये वाद धुमसत होता. यातून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते.

शनिवारी सकाळी चंद्रकांत पाटील यांचा मुलगा रितेश हॉटेलमध्ये आला होता. लॉजिंग सुरू असल्याने तो दिवसभर हॉटेलमध्येच थांबून होता. रात्री साडेनऊच्या सुमारास चंद्रकांत पाटील दुचाकीवरून हॉटेलमध्ये आले. यावेळी काही वेळातच संशयित दत्तात्रय पाटील व सचिन जाधव दोघे दुचाकीवरून या हॉटेलमध्ये आले. यावेळी चंद्रकांत पाटील व दत्तात्रय पाटील यांच्यामध्ये वाद सुरू झाला. दोघेही चंद्रकांत यांच्या अंगावर धावून गेले. दोघांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

रितेश याने मध्यस्थी करत वडिलांना सोडविण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत तो जखमी झाला. याचवेळी दत्तात्रय पाटीलने स्वतःजवळील गावठी कट्टा काढून चंद्रकांत पाटील यांच्यावर रोखून धरत थेट त्यांच्या छातीत गोळी झाडली. अवघ्या क्षणातच चंद्रकांत पाटील खाली कोसळले. तेव्‍हा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. काही सेकंदांत घटनास्थळी रक्ताचे थारोळे साचले होते.

गोळीबारानंतर काही वेळातच सचिन व दत्तात्रयने दुचाकीवरून पळ काढला. यानंतर रितेश याने याची माहिती नातेवाईकांना दिली. नातेवाईकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन चंद्रकांत पाटील यांना रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल केले. तत्पूर्वीच चंद्रकांत पाटील यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याबाबतचे काम सुरू होते. घटनास्थळी अप्‍पर पोलिस उपअधीक्षक निवेश खाटमोडे, पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी भेट दिली.

घटनास्थळावरून पुंगळी जप्त

गोल्डन हॉटेल कोविड नंतर बंद आहे. तेथे केवळ लॉजिंग सुरु आहे. यामुळे हॉटेलमधील सीसीटीव्ही बंद होते. त्यामुळे पोलिसांना फुटेज मिळाले नाही. संशयित पोलिस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अधिक माहिती घेतली तेंव्हा त्यांना तेथे एक नऊ एमएमची पुंगळी मिळाली. आणखी एक बार उडविण्याचा प्रयत्न झाल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात आले.

गावठी कट्टा कुठून मिळाला?

संशयित सचिन जाधव शेअर ट्रेडिंग करत होता. यामध्ये तो आर्थिक अडचणीत आला होता. त्यामुळे ऊस तोडणीसाठी जात होता. दत्तात्रय पाटील ऊस वाहतूक ट्रॅक्टरवर चालक आहे. दोघे सामान्य कुटुंबातील आहेत. मात्र, यांच्याकडे गावठी कट्टा आला कोठून? याचा तपास पोलिस करत आहेत. शवविच्छेदनावेळी इन कॅमेरा सर्व प्रक्रिया करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला.

खुपिरेतही बंदोबस्त

तरुणाचा खून झाल्यानंतर दोन्ही गावांतील तरुणांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी करवीर पोलिसांनी खुपिरे येथे बंदोबस्त ठेवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

Latest Marathi News Live Update : पावसाने मुंबईकरांचे हाल, वेस्टर्न एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी

'हेरा फेरी 3'ला मोठा धक्का? दिग्दर्शनाबाबत निर्मात्यांचा मोठा खुलासा

Fifa World Cup: किलियन एम्बापेचा जलवा... Golden Boot च्या शर्यतीत मेस्सीला मागे टाकले; फ्रान्स, नॉर्वे अन् मेक्सिको Round of 16 मध्ये

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT