Hotels at full capacity will not be able to start decision a meeting of the Hotel Owners Association at the Hotel Pavilion 
कोल्हापूर

हॉटेल व्यवसाय सुरू करायचे आहे पण या आहेत अडचणी

मोहन मेस्त्री

कोल्हापूर : शासनाने पाच तारखेला हॉटेल सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. परंतु हॉटेल साठी आवश्यक असणाऱ्या वेटर व्यवस्थापन आणि किचन स्टाफ यांच्या उपलब्धते शिवाय होटेल सुरू करणे अशक्य आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने हॉटेल उद्या सुरू होऊ शकणार नाहीत.


प्रशासनाच्या सर्व गाईडलाईन चे पालन करण्याकरिता आवश्यक तो वेळ हॉटेल चालकांना मिळणे आवश्यक आहे.  त्याचबरोबर हॉटेलच्या बैठक व्यवस्थेत  सोशल डिस्टन्स पाळणे  ही मोठी अडचण निर्माण होणार आहे.ग्राहक आणि कर्मचारी यांच्या आरोग्य रक्षणाच्या सर्व बाबींची पूर्तता करूनच  शहरातील हॉटेल व्यवसाय सुरू होतील. असा निर्णय आज हॉटेल मालक संघटनेच्या होटेल पॅव्हेलियन येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत कायदेशीर बाबींसाठी वकीलांचे आणि आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी डॉक्टरांचे मार्गदर्शन घेण्यात आले.


वेटरांना फेस शिल्ड आणि हॉटेल चे दर तीन तासांनी सॅनी टायझशन करायचे, दिवसातून तीन वेळा कर्मचाऱ्यांची ताप आणि ऑक्सीजन लेवल तपासणी गरजेची असल्याचे डॉक्टर कपाले यांनी सांगितले.या बैठकीस उज्वल नागेशकर, सचिन शानबाग ,आशिष रायबागे, मोहन पाटील, अरुण चोपदार तसेच शहरातील अनेक हॉटेल व्यवसायिक उपस्थित होते.

संपादन - अर्चना बनगे


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs NZ: जो रुट सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाच्या आणखी जवळ पोहचला! कसोटीत 'असा' पराक्रम करणारा जगातील दुसराच ठरला

T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या विजयानं टीम इंडियाला मोठा धक्का! सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी चूरस वाढली

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

SCROLL FOR NEXT