गोळ्या, पावडर, गुटखा, केमिकल, औषधांतून नशा
गोळ्या, पावडर, गुटखा, केमिकल, औषधांतून नशा sakal media
कोल्हापूर

Kolhapur : सरकारी यंत्रणा लगाम लावणार काय?

लुमाकांत नलवडे : सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : तंबाखू, गुटख्यापासून नशेला सुरुवात होते. पुढे त्याचे वेगवेगळे प्रकार व प्रमाण वाढत जाते. त्यामुळे पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्तपणे कारवाईची मोहीम उघडली पाहिजे. गोळ्या, पावडर, गुटखा, केमिकल, गांजा, औषधे अशा वेगवगेळ्या पद्धतीने नशा होते. याची होणारी खुलेआम विक्री कशी रोखता येईल? किंबहुना त्याला आवाक्यात कसे आणता येईल, याकडे सरकारी यंत्रणेने गांभीर्याने पाहिले तर याला लगाम बसू शकेल.

शाळा, महाविद्यालये यांसह सर्व औषध दुकानांतून गुंगीची (झोपेची) औषधे प्रिस्क्रीप्शन असल्याशिवाय दिली जाऊ नयेत. पानपट्टी, किराणा दुकानांसह इतर ठिकाणी गुटखा विक्री होऊ नये. मुखशुद्धीसाठीची पावडर (?) वापरावी की नाही, वापरली तर किती प्रमाण असावे. यासाठीही अन्न व औषध प्रशासन विभागाकडून छापे टाकण्याची मोहीम हाती घेतली पाहिजे. पोलिस प्रशासनाने त्यांना सहकार्य केले तर याचा प्रभाव आणखी वाढू शकतो. शहरात काही टपऱ्यांवरच गर्दी का होते? मोरेवाडीच्या रिंगरोडवर, हॉकी स्टेडियम-आयसोलेशन हॉस्पिटलच्या माळावर, संभाजीनगर बस स्थानक परिसरात, स्मशानभूमी रोडवर, शाहूपुरी, राजारामपुरी उपरस्ते, सायबर ते संभाजीनगर रिंगरोड, गांधी मैदान परिसर, धैर्यप्रसाद मंगल कार्यालय परिसर, राजारामपुरी, उद्यमनगरात धूम्रपानासह गुटख्याची विक्री होत असल्याचे सांगण्यात येते. येथे काही प्रमाणात कारवाई होते; पण त्याला व्यापक स्वरूप नसल्याने त्यांचे गांभीर्य वाढत नाही. पानपट्टी असोसिएशनमध्ये सहभागी नसणाऱ्या अनेक टपऱ्यांवर मुखशुद्धीच्या नावाखाली काय काय होते, हे उघड होण्यासाठी छापे पडले पाहिजेत. ही कारवाई कोणी करायची, या ताकतुंब्यात सक्षमपणे कारवाई होताना दिसून येत नाही. नशेसाठी उपलब्ध साधणे आणि तरुणाईचे अड्डेच उद्‌ध्‍वस्थ केले तर नशा करणाऱ्यांची संख्या कमी होण्यास मदत होईल.

नुकतेच ग्रामीण भागातील काही दुकानांतून झोपेच्या गोळ्या नशेसाठी दिल्या जात असल्याची माहिती पुढे येत आहे. घाटमाथ्यावरील एका तालुक्यात या गोळ्या ज्यांना अधिकार नाही ते विक्री करीत असल्याचे सांगण्यात आले. याच आठवड्यात या विक्रीवरून त्यांचा रस्त्यात वाद झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. पानपट्टी, किराणा दुकानांत गुटखा विक्री होणार नाही, याची खबरदारी कोण घेणार? कारवाई कोण करणार? कोल्हापुरातील मुख्य बाजारातून गुटख्याची होलसेल विक्री होत असल्याचे विश्‍वसनीय वृत्तांकडून सांगितले. मूळ तेथेच घाव घातला तर गांजा काय गुटखा विक्रीचेही धाडस होणार नाही. त्यासाठी पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाने कागदोपत्री नव्हे तर धडक कारवाईचे धाडस दाखविले पाहिजे.क्रमशः

कोल्हापूरच्या तरुणाईला वाचविण्याची अपेक्षा

सलम्या, मन्सूर, किरण अशी काही नावे या अवैध व्यवसायात असल्याचे सांगण्यात येते. तरुणाईला या नशेत गुंतवायचे. पुढे ते सांगतील ते काम करायला लावायचे. यंत्रणेत कोठे अडकला तरीही सोडवायची जबाबदारी ते घेत असल्याचे सांगण्यात येते. यातील काही पोलिस रेकॉर्डवरील असल्याचे समजते. त्यामुळे पोलिसांनी आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्त कारवाई करून नशेत बुडणाऱ्या कोल्हापूरच्या तरुणाईला वाचविण्याचे काम होईल, अशी माफक आशा सर्वसामान्य पालकांकडून ‘सकाळ’कडे व्यक्त झाली.

पालक, नागरिकांनीही जबाबदारी स्वीकारावी

साधारण दीड-दोन वर्षापूर्वी संभाजीनगर परिसरातील एक पानपट्टी महिलांनी केलेल्या लेखी तक्रारीनंतर स्थलांतरित झाल्याचे उदाहरण आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी किमान संबंधित पोलिस ठाणे, १०० क्रमांकावर दूरध्वनीद्वारे याची माहिती दिली पाहिजे. महापालिकेत याची तक्रार केली पाहिजे. त्यामुळेही कारवाई करणे अधिक सोपे होईल. सरकारी यंत्रणेबरोबरच पालक, नागरिकांनीही याची जबाबदारी स्‍वीकारली पाहिजे.

खुलेआम सिगारेट ओढणाऱ्यांवरही कारवाई हवी

‘स्मोकिंग झोन’ नसतानाही खुलेआम सिगारेटचा धूर सोडणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे. काही चहा गाड्यांवर चहासोबत सिगारेट ओढली जाते. सार्वजनिक ठिकाणांनी याची धडक कारवाई झाली पाहिजे. सीपीआर परिसर, मध्यवर्ती बस स्थानक, उच्चभ्रू वस्तीतील चौक, टपऱ्यांवर होणारी नशा थांबविता येणे शक्य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

Shashikant Shinde: मार्केट FSI घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल; निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची शक्यता

Latest Marathi News Live Update: पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

Hemant Soren : हेमंत सोरेन यांना धक्का! ईडी कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज; काय आहे प्रकरण?

Lok Sabha Election : ....म्हणून श्रीकांत शिंदेंना लोकसभेत पाठवणे गरजेचे; रामदास आठवलेंचे उल्हासनगरात आवाहन

SCROLL FOR NEXT