How to manage household expenses? 
कोल्हापूर

घरखर्च चालवायचा कसा ? रायगडावरील रहिवाशांसमोर प्रश्‍न 

संदीप खांडेकर

कोल्हापूर : अडीच महिन्याच्या संचारबंदीने दुर्गराज रायगडावरील रहिवाशांचा ताक, लिंबू सरबत, चहा विक्रीचा व्यवसाय ठप्प झाला आहे.

आर्थिक कमाई बंद झाल्याने घरखर्चाचा मोठा प्रश्‍न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. जीवनावश्‍यक वस्तूंचा पूरवठा काही प्रमाणात झाला असला तरी पुढच्या चार महिन्यांचा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा आहे. 

पर्यटनाचा केंद्रबिंदू म्हणून रायगडची ओळख आहे. गेल्या पंधरा वर्षांत गडावरील गर्दी वाढली आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे शिवराज्याभिषेक दरवर्षी साजरा केला जात असून, लाखो शिवभक्त गडावर हजेरी लावतात. हिरकणीवाडी, रायगडवाडी, नेवाळेवाडी, पाचाड, पुनाडेवाडी परिसरातील छोटी हॉटेल्सवाल्यांची आर्थिक कमाई चांगली होते. उन्हाळा व दिवाळीतील सुट्टीही त्यांना पैसे मिळवून देणारी असते. गडाच्या पायथ्याला पर्यटकांचा वाढता आकडा लक्षात घेत हॉटेल्स उभारण्यात आली आहेत. ज्यांची छोटे हॉटेल्स होती, त्यांनी नव्याने इमारतीचा विस्तार वाढवून पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था केली आहे. शेती कमी असल्याने निव्वळ लिंबू सरबत, ताक, कोकमसह अन्य खाद्यपदार्थांचे पॅकेट्‌स विकून इथल्या रहिवाशांना आर्थिक कमाई करावी लागते. 

यंदाच्या अडीच्या महिन्याच्या कालावधीत व्यवसाय ठप्प झाल्याने, गडपायथ्याच्या व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. गडावर सुमारे बावीस झोपड्या असून, तेथील रहिवासी लिंबू सरबत, ताक, कोकमची विक्री करतात. संचारबंदीने त्यांच्याकडील उपलब्ध धान्यसाठा संपला आहे. त्यांना काही संस्थांकडून त्याचा पुरवठा झाला असला तरी गडावरील पावसाचा जोर लक्षात घेता त्यांना पुढील चार महिने बाहेर पडणे मुश्‍किल असणार आहे. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. 

टकमकवाडी, आमडोशी, हिरकणीवाडी, नेवाळेवाडी, रायगडवाडी, छत्री निजामपूर, पुनाडेवाडी, शिंदे कोड, पाचाडमधून काही जण गडावर येऊनही त्याची विक्री करतात. त्यांनाही मदतीची गरज आहे. 

अडीच महिन्यात आमचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पावसाळ्यात आमचा व्यवसाय बंदच राहणार आहे. कोरोनाचे संकट दूर होऊन पर्यटकांसाठी रायगड खुला झाल्यानंतर आमची आर्थिक कमाई सुरू होईल. त्यासाठी दिवाळी सुट्टीची वाट पाहावी लागेल. 
- संजय आवकिरकर (रायगड) 


दृष्टिक्षेप
- पर्यटकांच्या वाढीमुळे दुकान, हॉटेल्स संख्या वाढली 
- लॉकडाउन काळात बंदमुळे मोठा फटका 
- संचारबंदीत काही संस्थांकडून अन्न, धान्य पुरवठा 
- व्यवसाय ठप्पमुळे घरखर्च चालवणेही बनलेय मुश्‍किल 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OYO Hotels: ओयो हॉटेलमध्ये एक तासात नेमकं काय होतं? सरकार अभ्यास करणार? सुधीर मुनगंटीवरांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

ENG vs IND: इंग्लंडच्या रस्त्यावर आकाश दीपचा दरारा! इंग्रज गात आहेत नवा नारा; Video व्हायरल

Stock Market Closing: सेन्सेक्स 9 अंकांच्या वाढीसह बंद; FMCG आणि रिअल्टी शेअर्स वधारले, 'हे' शेअर्स बनले टॉप गेनर्स

Xi Jinping: जिनपिंग यांच्या अधिकारात बदल शक्य; विकेंद्रीकरणाचे माध्यमांत वृत्त; नेतृत्वाच्या बदलाचीही रंगली चर्चा

SCROLL FOR NEXT