How to pay electricity bills?
How to pay electricity bills? 
कोल्हापूर

काम नाही, खायचे काय? अन्‌ भरमसाठ वीज बिले भरायची कशी ? 

गणेश शिंदे

जयसिंगपूर : दिल्ली सरकारने शंभर युनिटपर्यंत वीज बिल माफ केले आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने निर्णय घेऊन घरगुती वीज ग्राहकांना दिलासा द्यावा. लॉकडाउनमध्ये हाताला काम नाही. जवळचे चार पैसे खर्च झाले, आता खायचे काय ?, असा प्रश्‍न असताना भरमसाठ वीज बिले भरायची कशी, असा त्यांच्यापुढे प्रश्‍न आहे. घरगुती वीज बिले पूर्णपणे माफ करावीत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सर्व पक्षीयांच्या वतीने सोमवारी (ता. 13) घरगुती वीज बिलांची होळी केली जाणार आहे. सरकारने याची दखल घेऊन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

शेट्टी म्हणाले, "कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी आणि सर्वपक्षीयांच्या वतीने तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये स्वाभिमानीतर्फे हे आंदोलन केले जाणार आहे. लॉकडाउनमध्ये सर्वसामान्यांचा जगण्यासाठी संघर्ष सुरु आहे. अशा स्थितीत महावितरणकडून तीन महिन्यांची दुप्पट, तिप्पट बिले ग्राहकांच्या माथी मारली आहेत. लॉकडाउनमध्ये वीज दरवाढ केली आहे. वास्तविक या काळात सरकारने घरगुती वीज बिल माफ करुन ग्राहकांना दिलासा देण्याची गरज होती. दिल्ली सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने घरगुती वीज बिले पूर्णपणे माफ करावीत, या मागणीवर आम्ही आग्रही आहोत. यासाठी सोमवारी (ता. 13) राज्यातील सर्व जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी कार्यालय, महावितरण कार्यालयासह प्रत्येक तलाठी कार्यालयासमोर सकाळी बारा वाजता वीज बिलांची होळी करुन वाढीव बिलांचा निषेध आणि घरगुती वीज बिल माफीची मागणी केली जाणार आहे.' 

राज्यातील स्वाभिमानीच्या सर्व जिल्हाध्यक्षांना आंदोलनाबाबत आदेश दिले आहेत. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन हे आंदोलन केले जाणार आहे. राज्याच्या प्रत्येक जिल्हा आणि तालुक्‍यातील शासकीय कार्यालयासमोर नेटाने आंदोलन करुन घरगुती वीज ग्राहकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. 

- राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना 

राजू शेट्टी म्हणाले... 
- दिल्ली सरकारने शंभर युनिटपर्यंत वीज बिल माफ केले 
- महाराष्ट्र शासनानेही घरगुती वीज ग्राहकांना दिलासा द्यावा 
- सर्व पक्षीयांतर्फे सोमवारी वीज बिलांची होळी करण्यात येणार 
- हाताला काम नसताना भरमसाठ वीज बिले भरायची कशी? 
- लॉकडाउनमध्ये सर्वसामान्यांचा जगण्यासाठी संघर्ष सुरु आहे. 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SCROLL FOR NEXT