nitin raut
nitin raut sakal
कोल्हापूर

इचलकरंजी : यंत्रमागास सबसिडीप्रमाणे वीजबिल

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी: लघुदाब वीज ग्राहक असलेल्या राज्यातील यंत्रमागधारकांची वीजबिले सबसिडीनुसारच देण्याचा महत्त्वपूर्ण आदेश आज ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ‘महावितरण’ला दिला. २७ एचपीवरील यंत्रमागाच्या थकबाकीसंदर्भात वस्त्रोद्योग विभागाकडून मार्गदर्शक सूचना मिळताच अंमलबजावणी होईल. तोपर्यंत कनेक्शन तोडले जाणार नाही, अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली. यामुळे राज्यातील यंत्रमागधारकांना दिलासा मिळाला आहे.

२७ एचपीवरील व खालील सर्वच यंत्रमागधारकांना दिली जाणारी वीज सवलत महावितरणने रद्द केल्याने बिले दुप्पट दराने आली आहेत. त्यामुळे यंत्रमाग उद्योग आणखी संकटात सापडला आहे. या संदर्भात यंत्रमागधारक संघटनांच्या प्रतिनिधींनी चार दिवसांपूर्वी पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेत शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आज इचलकरंजी, भिवंडी तसेच अन्य वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी पालकमंत्री पाटील व इचलकरंजी इंडस्ट्रीयल इस्टेटचे चेअरमन राहुल खंजिरे यांच्यासमवेत ऊर्जामंत्री राऊत यांची मुंबई येथे भेट घेतली.

राऊत यांनी कोणत्याही स्थितीत यंत्रमागाचे वीज कनेक्शन तोडले जाणार नाही अशी घोषणा केली होती. तोच धागा पकडत यंत्रमागधारक प्रतिनिधींनी ठामपणे मते मांडली. वीज सवलत वजा झाल्याने दुप्पट दराने वीज बिले आली असून ती भरणे अशक्य असल्याचे सांगितले. लघुदाब वीज ग्राहक असलेल्या यंत्रमागधारकांची वीज बिले जुन्या पद्धतीनेच काढावीत, असे आदेश ऊर्जामंत्री राऊत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. थकबाकीवर व्याज अथवा दंड आकारण्यात येऊ नयेत, असेही त्यांनी सांगितले.

राहुल खंजिरे, सतिश कोष्टी, विनय महाजन, राजगोंडा पाटील, गोरखनाथ सावंत, सुरज दुबे, प्रविण कदम, रफिक खानापुरे, प्रकाश गौड, सुभाष बलवान, शरद देसाई, भिवंडीचे रशिद ताहीर मोमीन, रुपेश अग्रवाल यांच्यासह यंत्रमागधारक प्रतिनिधी उपस्थित होते.

पोकळ थकबाकी वजा करणार

२७ एचपीवरील यंत्रमागसंदर्भात चर्चेवेळी ऊर्जामंत्र्यांनी हा विषय ऊर्जा विभागाचा नसून, वस्त्रोद्योग विभागाशी संबंधित असल्याने त्यांनीच अनुदान थांबविल्याचे सांगितले. त्यावर वस्त्रोद्योग विभागाने सवलत पूर्ववत करण्याचे आदेश दिले असल्याचे निदर्शनास आणून दिले. मात्र, मागील दोन-तीन महिन्यांची बिले सबसिडी वगळून आली असून, त्यातील थकबाकी वजा करावी, अशी मागणी केली. त्यावर वस्त्रोद्योग मंत्र्यांचे स्पष्टीकरण आल्यावर दोन महिन्यांची पोकळ थकबाकी निश्‍चितपणे वजा करू, असे ऊर्जामंत्र्यांनी सांगितले.

विधानसभेत प्रश्न गाजला

यंत्रमागधारकांची वीज सवलत बंद करण्याच्या प्रश्नाचे विधानसभेत पडसाद उमटले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भूमिका मांडताना या संदर्भात गंभीर टिप्पणी केली. त्याबाबतची चित्रफीत आज शहरात व्हायरल झाली. यंत्रमागधारकांची वीज सवलत बंद न करण्याची मागणी त्यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Adani: गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; संपत्तीत झाली 4,54,73,57,37,500 रुपयांची वाढ

Pune News: पुण्यातील अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने दुचाकीस्वाराला चिरडले, शिरुरच्या अरणगावमधील घटना

Cricket: गोंधळच गोंधळ! रनआऊटसाठी बॉल हातातच यईना, छोट्या फिल्डर्सची पळता भुई थोडी, पाहा मजेशीर Viral Video

Salman Khan: सलमान खानच्या गाडीवर हल्ल्या करण्याचा बिश्नोई गँगचा मास्टर प्लॅन उघड, पाकिस्तानातून मागवणार होते शस्त्र; चौघांना केली अटक

Pune News: कर्वे रोडवर दुर्दैवी अपघात; क्रेन खाली येऊन सायकल स्वाराचा मृत्यू

SCROLL FOR NEXT