In Ichalkaranji Government Office Did Not Pay The House Tax Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

इचलकरंजीत प्रांत कार्यालयाचा घरफाळा 2009 पासून थकीत

पंडित कोंडेकर

इचलकरंजी : येथील प्रांत कार्यालय इमारतीचा घरफाळा 2009 पासून थकीत आहे. दंड व्याजासह ही रक्कम 18 लाख 26 हजार 782 आहे. या रकमेच्या वसुलीबाबत पालिका प्रशासनाकडून ठोस कार्यवाही का केली जात नाही, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. या संदर्भात ताराराणी आघाडीचे पक्षप्रतोद प्रकाश मोरबाळे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे विचारणा केली आहे. 

येथील संस्थानकाळात बांधलेल्या हवामहल बंगल्यामध्ये प्रांत कार्यालय सुरू आहे. या वास्तूचा ताबा सध्या जिल्हा परिषदेकडे आहे. दरवर्षी 76 हजार 302 घरफाळा पालिका प्रशासनाकडून आकारला जातो. पण 2009 पासून या वास्तूचा घरफाळाच पालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या ही रक्कम 18 लाख 26 हजार 782 रुपये झाली आहे. 

दुसरीकडे राजाराम स्टेडियमनजीक पालिकेच्या मालकिची सदनिका आहे. 2004 पासून प्रांताधिकारी यांच्या निवासस्थानासाठी त्या सदनिकेचा वापर केला जातो. ही इमारत भाडे तत्त्वावर दिल्यानंतर त्याचा घरफाळा भरणे अपेक्षित आहे. पण या सदनिकेचा घरफाळा तसेच घरभाडे 2014 पासून थकीत असल्याचा दावा मोरबाळे यांनी केला आहे. 

पालिकेची कोणतीही इमारत भाडेतत्त्वावर देताना निविदा किंवा लिलाव पद्धतीने देण्याचा नियम आहे. पण प्रांताधिकारी यांना निवासस्थान म्हणून देताना कोणती कार्यवाही केली, त्याचे भाडे वेळोवेळी भरले काय, याची चौकशी करावी, अशी मागणीही मोरबाळे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिले असून त्याची प्रत नगराध्यक्षांना सादर केली आहे. 

सामान्यांच्या मिळकतीची जप्ती 
सामान्य मिळकतधारकाचा एक वर्षाचा घरफाळा थकीत असेल तर जप्तीची कारवाई पालिका प्रशासनाकडून केली जाते. मग प्रांत कार्यालयाच्या इमारतीवर जप्तीची कारवाई काल केली जात नाही, असा सवाल मोरबाळे यांनी उपस्थित केला आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपला एका वर्षात देणगीपोटी मिळाले ६ हजार कोटी, सर्वाधिक कॉर्पोरेट सेक्टरमधून; एकट्या भाजपला काँग्रेससह ४ पक्षांच्या दहापट देणगी

Sangola Crime : हरवलेल्या १०० महिलांचा लावला शोध; सांगोला पोलिसांची कामगिरी, दहा मुली कुटुंबीयांच्या स्वाधीन

Solapur News : दोन कोटी रुपये खर्चून बेलाटीत उभारणार राम मंदिर; भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण

Pargaon News : पारगावमध्ये अग्नितांडव! इलेक्ट्रॉनिक गोडाऊनला भीषण आग; एक कोटीचे साहित्य खाक, रसाळ कुटुंबाचा १५ वर्षांचा संसार उघड्यावर

संतापजनक! दोन हफ्ते थकले, वसुली प्रतिनिधीनं मध्यरात्री कर्जदाराच्या पत्नीला केला कॉल; म्हणे, तुझी आठवण आली

SCROLL FOR NEXT