illegal alcohol rupees 1 lakh found in police home ichalkaranji kolhapur 
कोल्हापूर

बापरे! चक्क पोलीसाच्या घरात आढळला दारु साठा

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी (कोल्हापूर) : महाराष्ट्र पोलिस दलातील कॉन्स्टेबलाच्या घरावरच छापा टाकून राज्य उत्पादन शुल्क इचलकरंजी विभागाने गोवा बनावटीची विदेशी दारू जप्त केली. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल aयमनाप्पा आण्णासो वडर (वय ३३), युवराज नागाप्पा वडर (दोघे समतानगर शिरोळ), ऋषिकेश कृष्णा पाटील (रा. शिरोळ), विक्रम बाळासो गवळी (शिरटी), तानाजी मोहन थोरवत (घालवाड) या पाच जणांवर गुन्हा नोंद केला.  

या कारवाईत उत्पादन शुल्कने दारूचे १४ बॉक्‍स ताब्यात घेतले असून एकूण १ लाख ८ हजार ४८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसाच्या घरावर छापा टाकून उत्पादन शुल्कने दारू जप्त केल्याची चर्चा चांगलीच रंगली होती.

मिळालेली माहिती अशी, शिरोळ येथील समतानगर परिसरात बेकायदेशीरपणे गोवा बनावटीची विदेशी दारू विक्री सुरू असल्याची माहिती उत्पादन शुल्कला मिळाल्यानंतर पथकाने छापा टाकला. कारवाईत १४ खाकी कागदी खोक्‍यांच्या बॉक्‍समधील गोवा बनावटीची दारू आढळली. यामध्ये विविध ब्रॅंडचे १६ बॉक्‍स जप्त केले. कारवाईत एकूण १ लाख ८ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल उत्पादन शुल्कने ताब्यात घेतला.

कारवाईतील कॉन्स्टेबलसह अन्य चारही आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत विविध चार कलमाखाली गुन्हा नोंद केला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क इचलकरंजी विभागाचे निरीक्षक पी. आर. पाटील यांच्या पथकाने केली. या पथकात दुय्यम निरिक्षक श्रीमती वर्षा पाटील, सहाय्यक दुय्यम निरीक्षक राहुल गुरव, जी. एच. हजारे, सुभाष कोले, विलास पवार, प्रसन्नजीत कांबळे यांचा सहभाग होता.

संशयित कॉन्स्टेबल मिरजेत कार्यरत

संशयित आरोपी पोलिस कॉन्स्टेबल यमनाप्पा वडर गोवा राज्यातून शासनाचा महसूल बुडवून शिरोळ येथील राहत्या घरात बेकायदेशीरपणे दारू विक्री करत होते. अन्य चौघांच्या संगनमताने ही दारू विक्री शिरोळ परिसरात राजरोसपणे सुरूच होती. कारवाईतील मुख्य आरोपी यमनाप्पा वडर महाराष्ट्र पोलिस सेवेत कार्यरत असून मिरज शहर पोलिस विभागात सेवा बजावत आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT