The impact of a changing world on industries say sriram pawar 
कोल्हापूर

'बदलत्या जगाचा उद्योगांवर परिणाम'

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - जगाचा विचार करता एकूणच रचना आता बदलू लागली आहे. ती तीन ते चार विविध गटांत विभागली जाईल, असे स्पष्ट चित्र असताना त्याचा भारतीय उद्योगांवर निश्‍चितच परिणाम होणार आहे. भविष्यातील त्यातील आव्हाने आणि संधी ओळखून या साऱ्या गोष्टींकडे उद्योजकांनी सकारात्मक मानसिकतेतूनच पाहाणे आवश्‍यक असल्याचे स्पष्ट मत सकाळ माध्यम समूहाचे संपादक - संचालक श्रीराम पवार यांनी व्यक्त केले. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री ‘सीआयआय’च्या दक्षिण महाराष्ट्र विभागाच्या वतीने आयोजित ऑनलाईन सभेत ‘बदलते जागतिक प्रवाह आणि भारतीय उद्योगांवरील त्याचा परिणाम’ या विषयावर त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. 

जगातील एकूणच बदलती स्थित्यंतरं, कोरोनाचे संकट, भारतातील दरडोई उत्पन्न, भारतीय आणि जागतिक उद्योग, तंत्रज्ञानातील बदलते प्रवाह, त्यातील विविध आव्हाने व संधी, ग्लोबल वॉर्मिंगमुळे निसर्गात झालेले बदल, शासनाची विविध धोरणे, त्याची अंमलबजावणी, अशा विविध अंगांनी संपादक-संचालक श्री. पवार यांनी विस्तृत विवेचन केले. 

ते म्हणाले, ‘‘एकूणच जगाचा विचार केला, तर जगाची विभागणीच आता तीन ते चार गटांत होऊ लागली आहे. त्यामध्ये भारत कोणत्या गटाच्या बाजूने असेल, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. तंत्रज्ञानामध्येही आता मोठ्या प्रमाणावर बदल होऊ घातले आहेत. त्यामुळे ‘फिजिकली’ आणि ‘डिजिटली’ अशा दोन्ही पातळीवर भारतीय उद्योगांनी सज्ज असायला हवे.’’


ग्लोबल वॉर्मिंगचा मोठा परिणामही जगावर जाणवू लागला आहे. 
त्यातून अनेक पर्यावरणीय बदलांना सामोरे जावे लागते आहे. त्याचाही एकूणच भारतीय उद्योग आणि उद्योगांच्या कार्यपद्धतीवर परिणाम होणार असून त्यादृष्टीनेही उद्योजकांनी विचार करायला हवा, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

दरम्यान, ‘सीआयआय’चे अध्यक्ष प्रताप पुराणिक, उपाध्यक्षा पल्लवी कोरगावकर, ज्येष्ठ उद्योजक मोहन घाटगे, गिरीश चितळे, सचिन शिरगावकर, योगेश कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar discussion with Fadnavis : पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण ; अजितदादा मुख्यमंत्री फडणवीसांना नेमकं काय म्हणाले?

Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय: अर्धवट शिक्षण पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना मिळणार आणखी एक वर्ष

Latest Marathi News Live Update: वंदे मातरम ला दीडशे वर्षे पूर्ण पारोळा येथे सामूहिक वंदे मातरम गायन

Money Vastu Tips : खिशात एक रुपयाही टिकत नाही ? वास्तूचे हे उपाय करा आणि पैशांची होईल भरभराट

Indapur Crime: कळंबमध्ये १०० किलो गांजा जप्त; गांजा तस्करी करणाऱ्या टोळीवर वालचंदनगर पोलिसांची धडक कारवाई!

SCROLL FOR NEXT