Loksabha Election Raju Shetti esakal
कोल्हापूर

अतिआत्मविश्वासानेच आपला घात झाला, मागील चुका पुन्हा करून चालणार नाहीत; असं का म्हणाले राजू शेट्टी?

येऊ घातलेली लोकसभेची निवडणूक (Loksabha Election) तुम्हा आम्हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे.

सकाळ डिजिटल टीम

हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील बहुतांश गावातील कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित नसल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही तालुक्यांतील सुमारे ४० हून अधिक गावांतील कार्यकर्त्यांनी मेळाव्याकडे पाठ फिरविली.

हातकणंगले : येऊ घातलेली लोकसभेची निवडणूक (Loksabha Election) तुम्हा आम्हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. भांडवलशाही विरोधात लोकशाही, अशी ही लढाई असून, लोकशाही जिवंत ठेवायची असेल, तर कार्यकर्त्यांनी डोळ्यांत तेल घालून निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे, अशी भावना व्यक्त करत माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी रणशिंग फुंकले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शिरोळ व हातकणंगलेतील (Hatkanangle Constituency) प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आज ते येथे बोलत होते. ते म्हणाले, ‘‘मागील वेळेस आपणच अतिआत्मविश्वासानेच आपला घात झाला. मागील चुका पुन्हा करून चालणार नाहीत. यासाठी कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचून जबाबदारी ठामपणे पार पाडावी. केलेल्या कामाची माहिती मतदारापर्यंत पोहोचवण्याचे काम करायचे आहे. संघटनेपासून जे दुरावले आहेत त्यांनाही पुन्हा प्रवाहात आणावे.

जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, सावकार मदनाईक यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मेळाव्याला प्रकाश पाटील, अप्पा ऐेडके, सागर शंभूशेटे, सचिन शिंदे, जंभू कुमार, राजाराम देसाई, सुदेश पाटील, शैलेश आडके, महावीर पाटील, विठ्ठल मोरे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यकर्त्यांची पाठ...

हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील बहुतांश गावातील कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित नसल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही तालुक्यांतील सुमारे ४० हून अधिक गावांतील कार्यकर्त्यांनी मेळाव्याकडे पाठ फिरविली. संघटनेशी एकनिष्ठ राहिलेल्या अनेक कार्यकर्त्यांना मेळाव्याचा निरोपच मिळाला नसल्याने तेही नाराज झाल्याची चर्चा सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT