History Scholar Indrajit Sawant esakal
कोल्हापूर

'छत्रपती शिवरायांनी शहाजीराजेंच्या निधनानंतर जिजाऊंना सती प्रथेपासून परावृत्त केलं' : इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत

Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज यांनी शहाजीराजे यांच्या निधनानंतर जिजाऊंना सती प्रथेपासून परावृत्त केले.

सकाळ डिजिटल टीम

‘सती प्रथा ही मानवतेच्या विरुद्ध होती. इंग्रजांकडून सनातनी विचारांतून मुक्ततेसाठी पावले उचलण्यात आली नव्हती.'

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj) यांनी धर्माची बंधने झुगारून महिलांना शिक्षित करण्यासाठी पावले उचलली. तत्कालीन साडेपाचशे संस्थानिकांना जे जमले नाही, ते त्यांनी करताना कृष्णबाई केळुस्कर यांना वैद्यकीय शिक्षणासाठी मुंबई व लंडनला पाठवले. शाहू राजांच्या प्रेरणेनेच पहिल्या डॉक्टर महिला कोल्हापूर संस्थानात घडल्या, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी येथे केले.

राजर्षी शाहू सलोखा मंचतर्फे राजर्षी शाहू छत्रपती शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्त आयोजित ‘शाहूंची स्रियांच्या सामाजिक हक्कांबाबत दूरदृष्टी’ विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी ५१ महिला कार्यकर्त्यांचा प्रमाणपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला. राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनमधील मिनी हॉलमध्ये त्याचे आयोजन केले होते.

सावंत म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी शहाजीराजे यांच्या निधनानंतर जिजाऊंना सती प्रथेपासून परावृत्त केले. सातारच्या शाहू महाराज यांचे १७४९-५० ला निधन आल्यानंतर त्यांच्या पत्नी सकवारबाई बखेडा निर्माण करतील म्हणून नानासाहेब पेशव्यांनी दडपण आणून त्यांना सती जाण्यास प्रवृत्त केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरच्या गादीवर आल्यानंतर त्यांनी कायदा करून अनिष्ट प्रथा बंद केल्या. त्यांच्यासमोर क्रांतिकारी स्रियांचा आदर्श होता. त्यांनी महाराणी ताराबाईंचे मंदिर बांधले.’

History Scholar Indrajit Sawant

ते म्हणाले, ‘सती प्रथा ही मानवतेच्या विरुद्ध होती. इंग्रजांकडून सनातनी विचारांतून मुक्ततेसाठी पावले उचलण्यात आली नव्हती. शाहू महाराज यांनी शैक्षणिक चळवळ उभी केली. कडव्या धार्मिक असणाऱ्या पत्नी लक्ष्मीबाई यांनाही त्यांनी धर्म बंधनातून बाहेर काढले.’ यावेळी जीएसटीच्या सहायक उपायुक्त वैशाली काशीद, मंचचे वसंतराव मुळीक, बबन रानगे, शैलजा भोसले, विद्या साळोखे उपस्थित होते.

कन्‍या, सुनेला शिकारीची परवानगी

धर्माची बंधने झुगारल्याने शाहू महाराज यांचा हयातभर मानसिक छळ झाला. त्यांच्यावर वृत्तपत्रांतून जहरी टीका झाली. त्याकडे दुर्लक्ष करत शाहू राजांनी कन्या आक्कासाहेब महाराज व सून इंदुमती यांना शिकारीची परवानगी दिली. इंदुमती यांना तर त्यांनी डॉक्टर करायचे ठरवून, त्यांचे भविष्य सुरक्षित कसे होईल, याकडे लक्ष दिले होते, असे सावंत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT