Inferior asphalt stains the road; Roads bad in five months 
कोल्हापूर

निकृष्ट डांबराने रस्त्याला काळिमा  ; पाच महिन्यांतच रस्ते खराब 

सुनील पाटील

कोल्हापूर : शहरात चांगले रस्ते व्हावेत, यासाठी लोकांकडून वारंवार मागणी होत आहे. या पार्श्‍वभूमीवर खड्डेमुक्त कोल्हापूर करण्यासाठी 40 कोटींची निधी मिळाला; पण हे रस्ते करताना निकृष्ट डांबर वापरल्यामुळे चार ते पाच महिन्यांतच ते खराब होतात. त्यामुळे असे रस्ते पाहून शहरवासीयांकडूनही "आताच केलेले रस्ते खराब कसे झाले?' अशी संतप्त प्रतिक्रिया उमटते. यासाठी सरकारी रिफायनरीमधून आलेले डांबर वापरणे सक्तीचे करावे लागणार आहे. 
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद प्रशासनाने दोन वर्षांपासून रस्त्यांच्या कामासाठी राबवलेल्या पद्धतीचा अभ्यास करावा लागणार आहे. रस्ते करताना वापरले जाणारे डांबर हे हिंदुस्तान पेट्रोलियम किंवा भारत पेट्रोलियम या सरकारी रिफायनरीमधून येते. ते व्हिजी 30 या ग्रेडचे असते. त्यामुळे निश्‍चितपणे रस्ते दणकट आणि टिकावू होतात. हे डांबर सुमारे 30 रुपये लिटर असते; पण सध्या वापरले जाणारे डांबर हे 15 रुपयांपर्यंत असते. 
सध्या राज्यात कोरोनामुळे आर्थिक टंचाईचे संकट आहे. तरीही कोल्हापूरमध्ये पालकमंत्री सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या प्रयत्नामुळे रस्त्यासाठी 40 कोटींचा निधी मिळाला. यातून शहर खड्डेमुक्त व रस्ते चकाचक होणार आहेत; पण हे सर्व होताना रस्त्याचा दर्जा सुधारला नसेल तर पुन्हा त्यांची चाळण व्हायला वेळ लागणार नाही. एकाच पावसात रस्त्याची चाळण होते. हा अनुभव समोर ठेवून दर्जेदार रस्त्यांना प्राधान्य दिले पाहिजे. काही ठेकेदार जास्त नफा मिळवण्याच्या हव्यासापोटी दर्जाहीन डांबर वापरतात. काही ठेकेदारांनी कारवार येथील इम्पोर्टेड डांबर याचा साठा केला आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने सतर्क राहिले पाहिजे. 


रस्त्याचा दर्जा चांगला ठेवलाच पाहिजे. यासाठी सरकारी रिफायनरीमधीलच डांबर घेणे बंधनकारक केले आहे. तसेच जो रस्ता होणार त्याची तीन वर्षांपर्यंत हमी घेतली जाणार आहे. 
- नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता, मनपा. 

इम्पोर्टेड डांबर वापरून केलेला रस्ता काही महिन्यांतच खराब होतो. सरकारी रिफायनरीमधीलच डांबर वापरण्याला प्राधान्य देतो. तसेच महापालिकेतील बहुतांश ठेकेदार हे सरकारी रिफायनरीमधील डांबर वापरतात. 
- गणेश खाडे, ठेकेदार. 

सरकारी रिफायनरीमधील डांबर आणि इम्पोर्टेड डांबर याच्या दर्जात तफावत आहे. कर्नाटक आणि मुंबईतील काही व्यावसायिक अशा दर्जाहीन डांबराचा पुरवठा करतात. याला आळा बसण्यासाठी महापालिका प्रशासनाने सरकारी रिफायनरीच्या चलन सक्तीचा अवलंब करावा. 
आम्ही सरकारी रिफायनरीमधील डांबराचा पुरवठा करतो. 
- प्रदीप पाटील, डांबर व्यावसायिक. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT