international space station see by kolhapur people from today in kolhapur
international space station see by kolhapur people from today in kolhapur 
कोल्हापूर

आजपासून कोल्हापुरकरांना आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन पाहण्याची संधी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन सोमवारी (14) सायंकाळी सहा वाजून 22 मिनिटांपासून पाच मिनिटे पाहण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर गुरूवार (17) पासून रविवार (20) पर्यंत रोज पहाटे हे स्पेस स्टेशन अवकाशात पाहण्याची संधी मिळणार आहे. हे स्पेस स्टेशन पृथ्वीभोवती 90 मिनिटामध्ये एक प्रदक्षिणा पूर्ण करीत असते. त्याचा वेग एका तासाला 17 हजार 500 मैल म्हणजे 28 हजार किलोमीटर एवढा असतो. 

स्पेस स्टेशनवर पडणाऱ्या सूर्याच्या प्रकाशाचे परावर्तन होत असल्याने हे स्पेस सेंटर पहायला मिळते. हे पाहत असताना विमान अथवा मोठा तारा आकाशामधून जात आहे, असे दिसते. अशी माहिती विवेकांनद महाविद्यालयाचे पदार्थ विज्ञान व खगोलशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. मिलींद कारंजकर यांनी दिली. 

स्पेस स्टेशन पश्‍चिम वायव्य दिशेकडून दक्षिण दिशेकडे जाणार आहे. गुरूवारी (17) सकाळी 6 वाजून 7 मिनिटांपासून सहा मिनिटाकरता दक्षिण नैऋत्य दिशेकडून पूर्व ईशान्य दिशेकडे जाणार आहे. शुक्रवारी (18) पहाटे 5 वाजून 20 मिनटापासून एक मिनिटाकरिता दक्षिण आग्नेय दिशेकडून आग्नेय दिशेकडे जाणार आहे. शनिवारी (19) पहाटे 6 वाजून 8 मिनिटांपासून सहा मिनिटांकरिता पश्‍चिम नैऋत्य दिशेकडून उत्तर ईशान्य दिशेकडे जाणार आहे. रविवारी (ता. 20) पहाटे पाच वाजून 24 मिनिटांपासून तीन मिनिटांकरिता पूर्व आग्नेय दिशेकडून ईशान्य दिशेकडे जाणार असल्याचेही प्रा. डॉ. कारंजकर यांनी सांगितले.  

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: कर्नाटकात 28 जागांपैकी आम्ही 25 जागा जिंकणार- बीएस येडियुरप्पा

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

SCROLL FOR NEXT