Virendra Mandlik esakal
कोल्हापूर

मतदारसंघात तुमच्याबद्दल नकारात्मक वातावरण, मुश्रीफांनी 'त्या' उपकाराची परतफेड करावी; वीरेंद्र मंडलिकांचा घणाघात

Kagal Assembly Constituency Politics : ‘आगामी विधानसभेला मुश्रीफ यांच्या पराभवाने महायुतीला (Mahayuti) फटका बसू शकतो.'

सकाळ डिजिटल टीम

‘आजचा हा मेळावा हा फक्त ट्रेलर आहे. तुम्हाला पिक्चर बघायचा असेल तर तोही दाखवू,’ असे सांगत ॲड. मंडलिक यांनी विधानसभेला मुश्रीफ यांना सहकार्य न करण्याचा अप्रत्यक्षरीत्या इशाराच दिला.

सिद्धनेर्ली : ‘संपूर्ण मतदारसंघात तुमच्याबद्दल नकारात्मक वातावरण आहे. प्रत्येकी दहापैकी आठ मतदार नव्या चेहऱ्याची मागणी करीत आहेत. त्यामुळे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी थांबावे व दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांच्या उपकाराची परतफेड म्हणून महायुतीतून माझी उमेदवारी जाहीर करावी’, अशा शब्दांत पश्चिम महाराष्ट्र युवासेनेचे निरीक्षक व माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांचे पुत्र ॲड. वीरेंद्र मंडलिक (Virendra Mandlik) यांनी मुश्रीफांवर घणाघात केला.

शेंडूर (ता. कागल) येथे झालेल्या शिवसेना-युवासेना पदाधिकारी नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रम आणि भगवा मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नामदेवराव मेंडके होते. ॲड. मंडलिक म्हणाले, ‘आगामी विधानसभेला मुश्रीफ यांच्या पराभवाने महायुतीला (Mahayuti) फटका बसू शकतो. या जागेवर शिवसेना शिंदे गटाचा हक्क असल्याने महायुतीतून माझी उमेदवारी जाहीर करा. खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे शिवसेना पदाधिकारी व युवा कार्यकर्त्यांनी तशी मागणीही केली आहे.

कागल विधानसभा मतदारसंघातील (Kagal Assembly Constituency) १२१ गावांत शिवसेना शिंदे गटाचे भक्कम संघटन आहे. या जोरावर संघटनेचे पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे उमेदवारीची मागणी करणार आहोत. तुम्ही पाचवेळा आमदार, मंत्री झालात. आता थांबा. माझे आजोबा सदाशिवराव मंडलिक यांनी जातपात न पाहता तुम्हाला मानसपुत्र मानले. म्हणून तुम्हाला हे सर्व मिळाले. माझ्याकडे तुम्ही आता पुतण्यासारखे बघा आणि दिवंगत मंडलिकांच्या उपकाराची परतफेड करा. मागच्यावेळी तुम्ही शेवटची निवडणूक म्हणालात. मग, आता तुम्ही महायुतीची सीट घालवणार का? मला उमेदवारी देऊन युवा विरुद्ध युवा लढत करण्यात अडचण काय?’

यावेळी अनेक शिवसेना-युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक बोलून लोकसभेच्या पराभवाची खदखद व्यक्त केली. तालुका शिवसेना अध्यक्ष सुधीर पाटोळे, नेताजी बुवा, विजय पाटील, ॲड. राणाप्रताप सासणे, महिला आघाडीप्रमुख रूपाली पाटील, अनिल सिद्धेश्वर, महेंद्र घाटगे, भगवान पाटील, विश्वास कुराडे यांची भाषणे झाली. संदीप ढेरे यांनी स्वागत केले. शिवसेना तालुका अध्यक्ष सुधीर पाटोळे यांनी प्रास्ताविक केले.

‘गोकुळ’मध्ये खेकड्यासारखा पाय ओढला

‘गोकुळ’च्या निवडणुकीत पालकमंत्री मुश्रीफ व सतेज पाटील यांनी माझा व माझ्या आत्यांचा (सुस्मिता पाटील) ठरवून पराभव केला. उद्धव ठाकरे यांनी मला पुन्हा संधी देण्यास सांगितले. पण, मी ‘गोकुळ’मध्ये नको, असे या दोघांनी ठाकरे यांना सांगितले. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत मुश्रीफ यांनी माझा खेकड्यासारखा पाय ओढला. मानसपुत्र म्हणून सदाशिवराव मंडलिकांनी तुम्हाला पुढे आणले. मग, त्यांचा नातू का चालत नाही? तुमचा चिरंजीव निष्क्रिय आहे, म्हणून तुम्ही माझी अडवणूक करू नका’, असेही ॲड. मंडलिक म्हणाले.

लोकसभेला प्रामाणिक काम नाही

‘लोकसभेत प्रा. संजय मंडलिक यांच्यासाठी मुश्रीफ यांच्यासह समरजितसिंह यांनी प्रामाणिकपणे काम केले नाही. त्यामुळेच कागलमधील आमचे लीड १४ हजार झाले. मुश्रीफ यांनी शाहू महाराज यांना मदत करण्यास कार्यकर्त्यांना सांगितले. तर, समरजितसिंह यांनी जनक घराणे व आताचे घराणे एकच असल्याचे सांगून कार्यकर्त्यांना काय करायचे ते करा,’ असा निरोप दिल्याचे ॲड. मंडलिक म्हणाले.

हा तर ट्रेलर ...

‘आजचा हा मेळावा हा फक्त ट्रेलर आहे. तुम्हाला पिक्चर बघायचा असेल तर तोही दाखवू,’ असे सांगत ॲड. वीरेंद्र मंडलिक यांनी विधानसभेला मुश्रीफ यांना सहकार्य न करण्याचा अप्रत्यक्षरीत्या इशाराच दिला.

तुमचे आधीच ठरले होते का?

ॲड. मंडलिक म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीत तालुक्यातील उद्धव ठाकरे गटाने प्रचंड त्रास दिला. लोकसभेला विरोध करणारे संजय घाटगे निवडणुकीनंतर लगेचच तुम्हाला कसे काय चालतात? वर त्यांना केडीसीसी संचालकपदाची बक्षिसी दिली. महायुतीचा उमेदवार पराभूत करण्याचे तुमचे आधीच ठरले होते का?’

राजेखान जमादार यांची हकालपट्टी करा

ॲड. मंडलिक म्हणाले, ‘शिवसेना जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार शिवसेनेच्या अनेक बैठका, शिबिरांना उपस्थित राहत नाहीत. त्यांनी पक्षविस्तार केला नाही. त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करा, अशी मागणी करीत आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT