कोल्हापूर महापालिका
कोल्हापूर महापालिका  sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : घरफाळ्यात २७ कोटींची थकबाकी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: महापालिकेची घरफाळा वसुली यंदा १०० टक्के होणार नाही. ३१ मार्च आला, तरी २७ कोटींची थकबाकी वसूल होणे बाकी आहे. गेल्या वर्षीची थकबाकीही अद्याप पूर्ण वसूल झाली नाही. अपुरे मनुष्यबळ आणि थकबाकीदारांची घरफाळा न भरण्याची मानसिकता यामुळे महापालिकेची वसुली मोहीम धिम्या गतीने सुरू आहे. या आर्थिक वर्षात सुमारे दोन हजार ७५ मिळकतींवर कारवाई केली आहे.

जकात आणि त्यानंतर एलबीटी बंद झाल्यावर महापालिका उत्पन्नाचे घरफाळा आणि पाणीपट्टी हे दोन मुख्य स्रोत आहेत. घरफाळा आणि पाणीपट्टी वसुली १०० टक्के झाली नाही, तर कर्मचाऱ्यांचे पगार आणि निवृत्तीवेतनही वेळेवर देणे अवघड होते.

दोन वर्षे कोरोना आणि महापूर यामुळे नागरिकांची आर्थिक स्थिती जेमतेम होती. त्यामुळे महापालिका प्रशासनाला वसुलीसाठी सक्ती करता आली नाही. मात्र, या वर्षी सर्व व्यवहार सुरळीत झाल्याने आर्थिक गाडी रुळावर आली आहे. पण, महापालिकेकडूनच घरफाळा वसुली मोहीम गतीने न झाल्याने ३१ मार्चपर्यंत घरफाळा वसुली १०० टक्के होणे अशक्य आहे. गेल्या वर्षी घरफाळा थकबाकीत दंड, व्याज सवलत दिली होती. या वर्षी ही सवलत नाही. मात्र, प्रशासनाने दंड व्याज सवलत देणार नाही, असे जाहीर न केल्याने नागरिकांत याबाबत संभ्रम आहे. शेवटच्या काही दिवसांत सवलत जाहीर होईल, मग थकबाकी भरू, अशा मानसिकतेतही नागरिक आहेत. याचा परिणामही वसुलीवर झाला आहे. पोटनिवडणूक आणि महापालिका निवडणुकीची प्रभागरचना यामुळे घरफाळा वसुलीसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध झाले नाही. एकूणच या वर्षी जर १०० टक्के वसुली झाली नाही तर महापालिकेला पुढील आर्थिक वर्षात अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागेल.

घरफाळा वसुलीचे काम पूर्ण क्षमतेने सुरू आहे. अधिकाधिक लोकांना थकलेला घरफाळा भरण्याची सूचना केली. त्याप्रमाणे नागरिक थकबाकी भरत आहेत. चालू आर्थिक वर्षात सुमारे दोन हजार ७५ मिळकतींवर जप्तीची कारवाई केली आहे. नागरिकांनी थकीत घरफाळा भरून सहकार्य करावे. अन्यथा त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल.

- शिल्पा दरेकर, उपायुक्त, महापालिका

कारवाई अशी

जप्ती वसुली कारवाई संख्या २०७५

जप्ती वसुली नोटीसची रक्कम

१९ कोटी ८९ लाख ६० हजार ६३६

वसूल झालेली रक्कम

४ कोटी ११ लाख ३५ हजार ५११

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG Live Score : केएलनं नाणेफेक जिंकली; तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकाच मंचावर; 17 मे रोजी सभा

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्डचे उत्पादन

Gargai Dam Project : गारगाई प्रकल्पाला येणार वेग; मुंबईला मिळणार ४०० दशलक्ष लिटर पाणी

SCROLL FOR NEXT