कोल्हापूर

कोल्हापूर - 5 दिवसांसाठी शहरातील निर्बंध शिथिल; सर्व दुकाने सुरु

पालकमंत्री सतेज पाटील; आजपासून सर्व दुकाने सकाळी ७ ते ४ पर्यंत सुरू

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधात्मक (covid-19) आदेशानुसार लागू करण्यात आलेले निर्बंध सोमवार (५) ते शुक्रवार (९) या पाच दिवसांसाठी शिथिल करण्यात आले आहेत. (kolhapur city) या आठ दिवसांत शहरातील अत्यावश्यक सेवेसह इतर सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात दिलेल्या माहितीनुसार, शहरातील पॉझिटिव्ह रेट (positive rate) आणि रुग्ण संख्या याची माहिती देऊन प्रभारी जिल्हाधिकारी यांनी राज्य शासनाला पत्र दिले होते. जनभावनेचा विचार करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांनी शहरातील निर्बंध पाच दिवसांसाठी शिथिल केले आहेत. या कालावधीत शहरातील सर्व व्यवहार सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. आठ दिवसांनंतरची रुग्ण संख्या लक्षात घेऊन पुढील आदेश लागू केले जातील. मात्र जर या कालावधीनंतर रुग्ण संख्येत अपेक्षेपेक्षा अधिक वाढ झाली तर मात्र पुन्हा कडक निर्बंध लागू केले जातील. असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

सर्व सुरू झाले असले तरी नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये. तसेच विनाकारण गर्दी करू नये. यामुळे जर रुग्ण संख्या वाढली तर शासनाला पुन्हा निर्बंध लावण्याचा निर्णय दुर्दैवाने घ्यावा लागेल. आपण केलेल्या एखाद्या अनावश्यक कृतीमुळे हातावर पोट असणाऱ्या हजारो गरजू लोकांना विनाकारण त्रास सहन करावा लागू नये. याचासुद्धा विचार सर्वांनी करावा. त्यामुळे सर्वांनी योग्य ती दक्षता घेऊनच शहरातील व्यवहार सुरू ठेवावेत.

- सतेज पाटील, पालकमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT