Kolhapur Crime News
Kolhapur Crime News sakal
कोल्हापूर

Kolhapur Crime: घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

सकाळ वृत्तसेवा

Kolhapur Crime News : पन्हाळा, शाहूवाडी येथे घरफोड्या करणाऱ्या निकाजी अभिमान काळे (वय २६, रा. तुळजाभवानी मंदिरजवळ, अष्टी, बीड) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. त्याने जिल्ह्यात ७ घरफोड्या केल्याची कबुली दिली.

त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने आणि दुचाकी असा सुमारे १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याचा साथीदार असणाऱ्या एका अल्पवयीन मुलालाही या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातर्फे प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे.

प्रसिद्धी पत्रकातील माहितीनुसार, जिल्ह्यातील घरफोड्यांचा तपास करण्यासाठी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक विशेष पथक बनवले आहे. पथकातील अधिकाऱ्यांना घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांचा शोध घेत असताना निकाजी काळे याची माहिती मिळाली.

निकाजीने पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावात घरफोडी केली असून तो कोडोलीजवळील काखे फाटा येथे येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून निकाजीला ताब्यात घेतले.

त्याच्यासोबत त्याच्या एका अल्पवयीन साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी घरफोड्या केल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून सोन्याची बोरमाळ आणि अन्य काही दागिने जप्त करण्यात आले. त्यांच्याकडून जी दुचाकी जप्त करण्यात आली ती त्यांनी गुन्ह्यात वापरली होती.

एकूण १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. त्यांनी शाहूवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ५ आणि पन्हाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २ अशा ७ गुन्ह्यांची कबुली दिली.

ही कारवाई पोलिस निरीक्षक संजय गोर्ले, उपनिरीक्षक मोरे, वसंत पिंगळे, हिंदूराव केसरे, संजय हुंबे, प्रशांत कांबळे, रणजित कांबळे, आसिफ कलायगार, संजय पडवळ, अनिल जाधव, राजेंद्र वरंडेकर, सुहास पाटील, विनायक बाबर यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

SCROLL FOR NEXT