hasan mushrif,vinay kore esakal
कोल्हापूर

Political: जिल्हा बँक अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड; विनय कोरे डागणार तोफ

आज निवड: उपाध्यक्षपदी काँग्रेसला संधी शक्य

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या (KDCC Bank President Election)अध्यक्षपदी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif)यांची निवड निश्‍चित असून आज (ता. २०) होणाऱ्या नूतन संचालकांच्या पहिल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होईल. दुपारी तीन वाजता ही बैठक बँकेच्या मुख्य कार्यालयात होणार आहे.

दरम्यान, अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचे उमेदवार ठरवण्यासाठी सत्तारूढ गटाच्या १८ संचालकांची बैठक सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृहावर होणार आहे. या बैठकीत मुश्रीफ यांच्यासह उपाध्यक्षपदाचा उमेदवार निश्‍चित होईल. उपाध्यक्ष पद काँग्रेसला जाण्याची शक्यता असून आमदार राजू आवळे (Raju Awale) यांना पुन्हा एकदा या पदावर संधी मिळण्याची शक्यता आहे.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत संचालक पदाच्या २१ जागांपैकी १८ जागा जिंकून काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजप व कोरे यांच्या नेतृत्त्वाखालील आघाडीने बहुमत मिळवले आहे. या निवडणुकीत सत्तारूढ आघाडीचे तीन उमेदवार पराभूत झाले. सत्तारूढ गटाच्या नेत्यांनीच दगाफटका केल्याने हे उमेदवार पराभूत झाल्याचा आरोप आमदार डॉ. विनय कोरे यांनी केला आहे. यावरून कोरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना मला तुमच्यासोबत गृहीत धरू नका, असा इशारही दिला आहे. आपली ही भूमिका श्री. कोरे उद्या जाहीर करणार असल्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे तीन संचालक अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असतील तर कोरे यांच्यासह भाजपचे माजी आमदार अमल महाडिक हे त्यांना साथ देतील असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले होते. तथापि अशा काही हालचाली गेल्या आठवडाभरात होताना दिसत नाहीत. या आघाडीला काँग्रेस साथ देईल अशी शक्यता होती, पण त्यालाही अधिकृत दुजोरा मिळत नाही. उद्या (ता. २०) सकाळी विरोधी आघाडीच्याही तीन संचालकांसह शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची बैठकही शासकीय विश्रामगृहावर होत आहे. या बैठकीत निवडणूक लढवायची का नाही याची रणनीती निश्‍चित होईल.

कोरे डागणार तोफ

दरम्यान, अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्‍वभूमीवर आज सायंकाळी शासकीय विश्रामगृहावर मुश्रीफ व कोरे यांच्यात तासभर खलबते झाली. उद्याच्या बैठकीत मी स्पष्ट बोलणार आहे, त्याला तुम्ही परवानगी द्या अशी विनंती कोरे यांनी या बैठकीत केल्याचे समजते. यावरून उद्याच्या बैठकीत कोरे हे तोफ डागण्याची शक्यता आहे, त्याचेडी पडसाद निवडीत उमटणार आहेत.

मतदान झाल्यास गुप्त पद्धतीने

या निवडणुकीची प्रक्रिया दुपारी तीन वाजता सुरू होईल. अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचे अर्ज भरण्यास काही अवधी दिला जाईल. एकच अर्ज आल्यास ही निवडणूक बिनविरोध होईल. एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास मतदान गुप्त पद्धतीने घेण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Dog Life Imprisonment : ऐकावं ते नवलच! आता उत्तर प्रदेशात कुत्र्यालाही होणार जन्मठेप; योगी सरकारचा नवा निर्णय

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Thane Traffic: घोडबंदर मार्गावर दिवसा 'या' वाहनांना नो एन्ट्री, एकनाथ शिंदे यांचे निर्देश जारी

OCD Explained: OCD म्हणजे फक्त स्वच्छतेशी संबंधित नाही! डॉक्टरांनी सांगितले ऑब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसॉर्डरचे खरे स्वरूप

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

SCROLL FOR NEXT