kolhapur ex MLA village the domination on gram panchayat by congress party in kolhapur 
कोल्हापूर

Gram Panchayat Results : कोल्हापुरात आजी-माजी आमदारांच्या गावात काँग्रेसचे वर्चस्व कायम

साईनाथ पाटील

हळदी (कोल्हापूर) : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतलेल्या सडोली खालसा (ता. करवीर) येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सत्ताधारी काँग्रेसने ग्रामपंचायतवर दुसऱ्यांदा आपले वर्चस्व प्रस्थापित करत सत्ता हस्तगत केली. काँग्रेसने गेल्या वेळेपेक्षा दोन जागा जास्त जिंकल्या असून पहिल्यांदाच गावात झालेल्या तिसऱ्या आघाडीचा मात्र धुव्वा उडाला आहे. तसेच तिसऱ्या आघाडी प्रमुखाचा पन्नास मतांनी पराभव झाला आहे. एकूण तेरा जागांपैकी दहा जागा काँग्रेसने तर तीन जागा शेतकरी कामगार पक्षाने जिंकल्या. 

तिसऱ्या आघाडीला भोपळा देखील फोडता आला नाही. 
सदर निवडणूक बिनविरोध होण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले होते. पण अंतिम टप्प्यापर्यंत जागा वाटपाचा तिढा सुटला नसल्याने निवडणूक लागली होती. यावेळी गावात पहिल्यांदाच झालेल्या तिरंगी लढतीमध्ये आजी - माजी आमदारांचे जवळचे नातेवाईक असणारे स्वरुपसिंह पाटील यांनी तिसरी आघाडी करत सर्व जागांवर उमेदवार उभे केले होते. पण त्यांचा सर्व जागांवर पराभव झाला.जागा वाटपापासूनच चर्चेत असणारी निवडणूक तिसऱ्या आघाडीमुळे चुरशीची झाली होती. या निवडणुकीमध्ये एकप्रकारे विद्यमान आमदार पी. एन.पाटील व माजी आमदार संपतराव पवार पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Mass Copy : बारावी निकालादरम्यान मोठी खळबळ! 250 हून अधिक विद्यार्थ्यांवर कारवाई; गोंदिया-वर्ध्यातील 243 विद्यार्थी अनुत्तीर्ण, बोर्डाचा कठोर निर्णय

डॉक्टर 'डिलिव्हरी जिहाद' करतात, हिंदू महिलांचं सिझेरियन कसं? कालीचरण महाराजांचं पुन्हा वादग्रस्त विधान

शिवकालिन इतिसाहातील एक सुवर्ण पान! भव्य सेट, दमदार संवाद आणि अ‍ॅक्शन सीन; कसा आहे 'राजा शिवाजी'?

Crime: धक्कादायक! ८ मुलांची आई ५ मुलं असलेल्या जावयासोबत पळाली, पती म्हणतो- १२ वर्षाआधी पण त्यांनी...

अन्न सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, गुणवत्तेकडे लक्ष देण्याचे आवाहन; तज्ज्ञांचा नागरिकांना सावधगिरीचा इशारा

SCROLL FOR NEXT