kolhapur first district of Grants deposited directly in bank account handicapped 
कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा पुन्हा राज्यात भारी; दिव्यांगांसाठी घेतला मोठा निर्णय 

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर - राज्यातील कोल्हापूर जिल्हा हा पहिला जिल्हा आहे ज्याने दिव्यांगाना थेट बॅंक खात्यात सानुग्रह अनुदान जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जिल्हा परिषदेतून खास अनुदान दिले आहे. दिव्यांना याचा दिलासा मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी जाहीर केली आहे. 

दिव्यांगाना मिळणाऱ्या वेगवगेळ्या अनुदानासाठी आता पाठपुरावा आणि त्यासाठी आवश्‍यक ती धडपड करावी लागणार नाही. तसेच त्यांच्या अनुदानातील रक्कमेचा भ्रष्टाचार होणार नाही, चिरीमिरी जाणार नाही. कारण आता जिल्ह्यातील लाभार्थी दिव्यांना त्यांचे अनुदान डी.बी.टी.द्वारे थेट त्यांच्याबॅंक खात्यावर जमा होणार आहे. 

जिल्ह्यातील पात्र 24 हजार 833 दिव्यांगांना मंजूर अनुदानातून प्रत्येक लाभार्थ्यांना सानुग्रह अनुदान प्रत्येकी 350 प्रमाणे मंजूर केले आहे. अनुदान डी.बी.टी.द्वारे संबंधितांच्या बॅंक खात्यावर ग्रामपंचायती मार्फत वर्ग करण्याची कार्यवाही करणारा कोल्हापूर जिल्हा राज्यात एकमेव आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या निधीतून 89 लाख 52 हजार 161 इतकी तरतूद मंजूर करण्यात आली आहे. तसेच 18 वर्षावरील दिव्यांगांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी 1 कोटी 5 लाख 61 हजार 300 इतकी तरतुद करण्यात आली आहे. यातून दिव्यांना विनात्रास बॅंकेतील खात्यावर अनुदान मिळणार आहे. 
                       
संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : विनायक चतुर्थीनिमित्त अन्नदान कार्यक्रमात दुर्दैवी अपघात; गरम सांबारच्या भांड्यात पडून महिलेचा मृत्यू,थरकाप उडवणारा व्हिडिओ

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

SCROLL FOR NEXT