दख्खनचा राजा श्री जोतिबा  sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : जोतिबाची चैत्र यात्रा यंदा होण्याची दाट शक्यता

गुरुवारी सासनकाठी धारकांची बैठक

निवास मोटे : सकाळ वृत्तसेवा

जोतिबा डोंगर: दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा कोरोनाच्या संसर्गामुळे सलग दोन वर्षे झालेली नाही. परिणामी ग्रामस्थ , पुजारी , दुकानदार , व्यापारी यांना मोठा आर्थीक फटका सहन करावा लागला. यात्रा काळात लाखो भाविकांना घरात बसण्याची वेळ आली. जोतिबाची चैत्र यात्रा यंदा १६ एप्रिल रोजी आहे.

या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीच्या वतीने तयारी सुरू झाली आहे . मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या दर्शन मंडपातून यंदा चैत्र यात्रेत दर्शन रांग केली जाणार आहे. याची चाचणी रविवारी घेण्यात आली. तसेच मंदिराची पाहणी प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगे ,देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडी यांनी केली. तसेच येत्या गुरुवारी सर्व मानाच्या सासनकाठी प्रतिनिधींनी चैत्र यात्रे संदर्भात खास बैठक बोलविली आहे. यासाठी सर्व सासनकाठी धारक गुरुवारी डोंगरावर येणार आहेत .बैठक घेऊन ते जिल्हाधिकार्‍यांना भेटणार आहेत.

जोतिबा डोंगरावर यात्रेत सुमारे सात ते आठ लाख भाविकांची यात्रा भरते. गेली दोन वर्षे मात्र कोरोनामुळे या त्रा भरली गेली नाही. मंदिरात केवळ प्राथमिक स्वरूपात धार्मिक विधी करून चैत्र यात्रा साधेपणाने केली गेल्या वर्षी फक्त पालखी सोहळा मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थीतीत काढला. यंदा जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्गाचे चित्र सौम्य स्वरूपाचे आहे .त्यामुळे डोंगरावर होणारी चैत्र यात्रा यंदा होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता वसमत त्यामुळे आता पासूनच मंदिर परीसरात चाचणी घेण्यास सुरुवात झाली आहे . २०१९ पासून मंदिर परिसरात भव्य दर्शन मंडप उभा करण्याचे काम सुरु आहे .तीन मजल्यांचे काम पूर्ण झाले असून चौथ्या मजल्याचे काम सध्या सुरू आहे . हे ही काम मार्च महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचना सचिव श्री नायकवडी यांनी ठेकेदाराला दिल्या आहेत. त्यामुळे या दर्शन मंडपातून दर्शन रांग लावल्यामुळे मंदिर परिसरातील गर्दी कमी होणार आहे. सासनकाठी मिरणूकीला ही जागा मिळणार आहे.

यंदा चैत्र यात्रा होण्यासाठी आम्ही गुरुवारी सर्व सासनकाठी प्रतिनिधींची बैठक बोलवली आहे. या बैठकीत यात्रेसंदर्भात चर्चा केली जाणार आहे. सलग दोन वर्ष यात्रा नाही आम्हा सर्व सासनकाठी चालकांना धार्मिक विधी गावातच करावे लागले. यंदा कोरोना कमी झाला आहे. त्यामुळे यंदा यात्रेत आम्हा सर्व सासन काठी चालकांना यात्रेत येण्याची परवानगी मिळण्यासाठी आम्ही जिल्हाधिका-यांना भेटणार आहोत. रामराव साळुंखे सचिव, संत नावजीनाथ देवस्थान कमिटी किवळ ता. कराड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: ''मी 'आरएसएस'चेही रक्षण करणार'', राहुल गांधींचं मोठं विधान, संघाबद्दल नेमकं काय म्हणाले?

WTC Final Qualification Scenario: भारताला फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर उरलेले सामने महत्त्वाचे; जाणून घ्या टीम इंडियाचं गणित

मला तिचे बॉयफ्रेंड आवडत नाहीत... लेकीच्या रिलेशनशिपवर संजय जाधव यांचं स्पष्ट मत; म्हणाले, 'तुम्ही घरी या, बोला, पण...'

NHAI New Rules: रुग्णवाहिका उशिरा आली तर दंड होणार! NHAI चा मोठा निर्णय; सर्व प्रकल्पांत ‘केअर सिस्टम’ बंधनकारक, नवे नियम काय?

BMC Recruitment: मुंबई महापालिकेत ६१२ जागांवर भरती; ITI पास तरुणांना मोठी संधी! पाहा कोणती पदे आणि अर्ज प्रक्रिया काय?

SCROLL FOR NEXT