kolhapur kasaba tarle girl pass in banking exam 
कोल्हापूर

कोल्हापूरची कन्या बँकिंगमध्ये ठरली डोळस !  

सुरेश साबळे

कसबा तारळे - सध्या डोंबीवलीत राहत असलेली व दोन्ही डोळ्यांनी अंध असलेली मंगला शैलेश आंबेकर (मुळ गाव, कसबा तारळे, ता राधानगरी) हिची कॅनरा बँकेत कारकून पदी निवड झाली आहे. मंगला अंध असूनही बँकिंगच्या परीक्षेतून तिने मिळविलेल्या गुणांच्या जोरावर ती अनारक्षित जागेच्या टक्केवारीवर निवडली गेल्याने तिचे विशेष कौतुक होत आहे. अंध मंगला बँकिंगसाठी जणू 'डोळस'च ठरली आहे!

येथील शैलेश रमेश आंबेकर हे दोन्ही डोळ्यांनी अंध असून ते नोकरी निमित्ताने डोंबीवलीत (जि.ठाणे) राहतात. त्यांची पत्नी मंगला ही सुध्दा दोन्ही डोळ्यांनी अंध आहे. तिने अंधांसाठी असलेल्या विशेष शिक्षण प्रणालीतून बी. एड. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. तत्पूर्वी हिंदी विषयात तीने बी. ए. केले आहे. गेली काही वर्षे पती-पत्नी डोंबीवलीत स्थायिक आहेत. एकमेकाला साथ देत त्यांचा संसार सुरू असून त्यांचा 5 वर्षांचा मुलगा गावी आजी, काकांकडे राहतो.

संसारासाठी पती नोकरी करतात. मंगलानेही आपले काम-धंदा सांभाळून बँकिंगसाठी परीक्षा देण्याचे ठरवून तसे अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि मंगला चक्क विशेष प्रावीण्यासह या परीक्षेत यशस्वी झाली. इतर मागासवर्गीय समाजासाठीचे तसेच अंधांसाठीचे विशेष आरक्षण असूनही अभ्यासाच्या जोरावर मंगलाने या परीक्षेत अधिकचे गुण मिळविल्याने ती अनारक्षित (सर्वसाधारण) जागेतून कॅनरा बँकेसाठी क्लार्क पदावर निवडली गेली. तिने मिळविलेले हे यश डोळस असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरले आहे. साहजीकच या यशाबद्दल परिसरातून तिचे कौतुक होत आहे. पती शैलेश व माहेर आणि सासरकडील मंडळींच्या प्रेरणा व सहकार्यामुळेच हे यश मिळाल्याचे मंगलाने 'सकाळ'ला सांगितले.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत पीएम मोदींच्या कार्यक्रमापूर्वी सुरक्षेत मोठी त्रुटी! बंदूकधारी अन् बनावट PMO अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नावही माहिती नसलेल्या खेळांचे बोगस प्रमाणपत्र! वर्ग १ आणि वर्ग २च्या नोकऱ्या मिळवल्या; दोघे अटकेत, एक हजार सर्टिफिकेट वाटल्याचा दावा

Duleep Trophy: शमी-मुकेशच्या माऱ्यासमोर दक्षिण विभागाची दाणादाण; पण पडिक्कल पाठोपाठ तिलक वर्माची झुंज, ठोकली तिसरी फिफ्टी

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

VIDEO: फार्महाऊसवर बिबट्याची एन्ट्री, मनसेच्या नेत्याचा पाळीव कुत्रा 'रॉकी'ची थरारक झुंज; घटना CCTVत कैद

SCROLL FOR NEXT