कोल्हापूर

व्यापारी भडकले; कोल्हापुरात सोमवारपासून व्यापार सुरूच!

लुमाकांत नलवडे : सकाळ वृत्तसेवा

व्यापाऱ्यांचा कोपरा सभेत निर्धार - प्रशासनाची अरेरावी झाल्यास ठाण्यासमोर निषेध नोंदविणार

कोल्हापूर : शासन निर्णय देवो अगर न देवो सोमवार (ता.५)पासून कोणत्याही परिस्थितीत सर्व दुकाने सुरू करायचीच असा ठाम निर्धार आज जनता बझार चौकात झालेल्या व्यापाऱ्यांच्या कोपरा सभेत घेण्यात आला. तसेच पुढील दिशा ठरविण्यासाठी उद्या (ता.४) महाद्वार रोडवर सकाळी दहा वाजता सर्व व्यापारी एकत्रीत येवून बैठक घेण्यात येईल, असाही निर्णय झाला. तसेच पोलिसांनी अरेरावी केल्यास पोलिस ठाण्या जवळ जावून निषेध व्यक्त करण्याचा ही निर्णय घेण्यात आला. (kolhapur-lockdown-merchant-agition-trending-news)

महाराष्ट्र व्यापारी असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष ललीत गांधी तसेच कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष संजय शेटे यांनी कोपरा सभेत मार्गदर्शन केले. तेथे हा निर्णय घेण्यात आला. अन्यायी लॉकडाउन रद्द करा, व्यापाऱ्यांवरील अन्‍याय दूर करा, लॉकडाऊन काळातील घरफाळा, वीज बील, बॅंक व्याज माफ करा, व्यापार आमच्या हक्काचा मेहरबाणी नको, आम्हास व्यापार सुरू करण्यास परवानगी द्या, असे फलक हाती घेवन व्यापारी कोपरा सभेत सहभागी झाले होते. यावेळी काही व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास महापालिक कर्मचारी आणि पोलिसांकडून दादागिरी होत असल्याचे सांगितले. अशावेळी प्रशासनाच्यावतीने व्यापारी वर्गाला दुकाने बंद करण्याकरता अरेरावीची भाषा वापरू न देता काय कायदेशीर कारवाई करायची आहे ती करा, असा पवित्रा घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. अरेरावी ची भाषा वापरू देऊ नका असा सल्ला देवून त्यालाविरोध करण्याच्या सुचना देण्यात आल्या. ज्या ठिकाणी असे प्रकार घडतील त्यांनी व्यापारी असोसिएशनकडे तात्काळ तक्रार करा असेही कोपरा सभेत जाहीर करण्यात आले.

माझा व्यापार माझी जबाबदारी

कोल्हापूर जिल्ह्यात ‘माझा व्यापार, माझी जबाबदारी‘अशी भूमिका घेवून सोमवारपासून दुकाने उघडण्यचा निर्णय येथे जाहीर करण्यात आला. चेंबर ऑफ कॉमर्स आणि राजारामपुरी व्यापारी असोसिएशन येथे हातात हात घालून एकत्रित लढा देत असल्याचे आज दिसून आले. दोन्ही संघटनांचे पदाधिकारी येथे उपस्थित होते. त्यांनी ‘माझा व्यापार माझी जबाबदारी‘ अशा पद्धतीने दुकाने उघडण्याचा निर्णय घेवून कोरोनाबाबत सर्व नियम पाळण्याचेही येथे जाहीर केले.

सोमवारपासून दुकाने उघडताना काय दक्षता घ्यायची, पोलिस प्रशासन आणि महापालिका कर्मचाऱ्यांनी अरेरावी केली तर काय करायचे याची पुढील दिशा ठरविण्यासाठी उद्या (ता.४) सकाळी दहा वाजता महाद्वार रोडवर व्यापाऱ्यांनी बैठक घेण्याचाही निर्णय येथे ललीत गांधी यांनी जाहीर केला. माणिक पाटील चुयेकर, शिवाजीराव पोवार, संजय पाटील यांच्यासह अऩ्य व्यापारी संघटनांचे पदाधिकारी येथे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash Baramati : बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना; प्रशिक्षण विमान कोसळलं

Maharashtra Teacher Promotion: शिक्षक पदोन्नतीचा मार्ग मोकळा; ‘टीईटी’ची अट कायम; ३१ पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश

Mumbai: मुंबईतील पदपथांवरील अतिक्रमणे १५ दिवसांत हटवणार, निष्काळजी अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार; महापालिकेची नवी उपाययोजना

Marathi News Live Updates : जेजुरीजवळ चारचाकी-दुचाकीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी

Satara District Bank: सातारा जिल्हा बँक निवडणुकीआधी राजकीय खलबतं; सुनेत्रा पवार-उंडाळकरांची ‘कमरा बंद’ चर्चा चर्चेत

SCROLL FOR NEXT